मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या (Dia Mirza) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या भाचीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या भाचीचा एक हसणारा फोटो शेअर केला आहे. दियाने ही पोस्ट शेअर करताच त्यावर बॉलिवूडमधील विविध सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट करत दियाच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीच्या भाचीने अगदी कमी वयात या जगाचा निरोप घेतला.

हे वाचा-पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचा मृतदेह

ही दु:खद बातमी शेअर करताना दिया मिर्झा लिहिते की, ‘माझी भाची, माझं बाळ, माझी जान… तू हे जग सोडून निघून गेलीस. डार्लिंग, तू जिथे असशील तिथे तुला शांती आणि प्रेमच मिळो. तू नेहमी आम्हाला मनापासून आनंदी केलेस. तू जिथे असशील तिथेही तुझ्या आनंद, डान्स आणि गाण्यामुळे प्रकाश पसरेल. ओम शांती’.


दरम्यान दियाच्या भाचीचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत माहिती समोर आली नाही आहे. एवढ्या कमी वयात लाडक्या भाचीचा मृत्यू झाल्याने दियाला मोठा धक्का बसला आहे. दियाच्या पोस्टनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सिद्धार्थ चतुर्वेदी, रीद्धिमा कपूर, गौरव कपूर, इशा गुप्ता, गौहर खान, राहुल देव या कलाकारांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर तिच्या भाचीसाठी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.