म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः स्वप्न पडले नाही, असा माणूस पृथ्वीतलावर कुठेच सापडायचा नाही. लालबागच्या व्यापाऱ्यालाही असेच एक स्वप्न पडले. त्याच्या स्वप्नात खुद्द त्याचे वडील आले आणि त्यांनी कोट्यवधींच्या खजिन्याची माहिती दिली. खजिना सापडत नसल्याने व्यापारी पोलिसांत गेला. पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आणि नवल म्हणजे हा सोने, हिऱ्यांचा खजिना सापडलाही.

लालबाग येथील व्यापारी दीपक जैन यांच्या कुटुंबीयांनी गिरगावच्या विठ्ठलवाडी परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. वडिलांचे निधन झाल्यानंतर ती खोली बंदच होती. याचदरम्यान एका रात्री गाढ झोपेत असताना, दीपक यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे वडील आले. गिरगावातील खोलीत चार कोटींच्या दागिन्यांचा खजिना असल्याचे त्यांनी स्वप्नात सांगितले. यावरून दीपक यांनी गिरगावातील घर गाठले. मात्र, अनेक महिने येथे कोणी न आल्याने घराची साफसफाई केल्याचे घरमालकाने सांगितले. साफसफाई दरम्यानच दागिने चोरीला गेले असावेत, असा विचार करून जैन यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात चार कोटींच्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीची तक्रार दाखल केली.

वाचाः विधान परिषदेसाठी आज मतदान; महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला

पोलिसांनी तपास सुरू केला. गिरगावमधील घरमालकाने ज्यांच्याकडून घराची सफाई करून घेतली त्यांची माहिती घेतली. तेथील सफाई कामगार प्रकाश, त्याचा मुलगा प्रवीण आणि यासिक या तिघांनी सफाई केली होती. या तिघांवर पाळत ठेवली असता, त्यांच्या राहणीमानात बदल झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनीच हे दागिने चोरल्याचे स्प्ष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो सोन्याची बिस्किटे, ८०० ग्रॅम सोने आणि जवळपास एक कोटी २५ लाखांचे हिरे हस्तगत केले.

वाचाः राज्यसभेसारखा गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेसचे कसोटीचे प्रयत्न; आमदारांना केलं मार्गदर्शनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.