राजकोटः गुजरातमधील राजकोटमध्ये एका व्यक्तीला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. विमा उतरवला असूनही विमा कंपनीने उपचाराचा खर्च देण्यास नकार दिला. मात्र, रुग्णाने विमा कंपनीला दणका देत उपचाराचा खर्च वसूल केला आहे.

राजकोट येथे राहणारे मधुकर वोरा असं या रुग्णाचे नाव आहे. रुग्णाला फुफ्फुसाचा कर्करोगाचे निदान झाल्यावर त्याचे उपचारांचा खर्च विमा कंपनीकडून मागितला मात्र, पीडित चेन स्मोकर आहे, त्यामुळे त्याला कर्करोग झाल्याचे कंपनीने म्हटलं होतं. तसंच, खर्च देण्यासही नकार दिला. त्यानंतर, पीडित रुग्णाने ग्राहक वाद निवारण आयोगात गुन्हा दाखल केला. आता ग्राहक मंचाने त्या व्यक्तीला खर्च देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

मधुकर वोरा यांना फेब्रुवारी २०१८मध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अहमदाबादच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना फफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी उपचारांचा खर्च ६ लाख ५३ हजार इतका आला. त्यावेळी त्यांनी विमा कंपनीकडे ५ लाख ५३ हाजारांचा उपचार खर्च मिळावा म्हणून दावा दाखल केला. मात्र, ओरिएंटल इन्शूरन्स कंपनीने ३० एप्रिल २०१९मध्ये हा दावा फेटाळन लावत पीडीत रुग्ण चेन स्मोकर असल्याचं म्हटलं होतं.

वाचाः अयमान जवाहिरीची ‘ती’ एक चूक महागात; अमेरिकेने संधी साधत केला कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा
त्यानंतर वोरा यांनी ग्राहक वाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सिगारेटमध्ये निकोटीन नशेसाठी वापरले जाते हे सिद्ध करता आलं नाही. त्याचबरोबर वोरा यांना सिगरेट प्यायल्यामुळं कर्करोग झाला असंही सिद्ध झालं नाही. त्यानंतर आयोगाने निर्णय देत म्हटलं की विमा कंपनीने बिनबुडाचे आक्षेप घेऊन त्यांच्या सेवेत कसूर केली.

वाचाः लायकी नसलेल्यांच्या हाती देश उभारणीचे काम; अभिनेता सुबोध भावेची जोरदार टीका

‘आम्हाला आमच्या तपासादरम्यान आणि हॉस्पिटलच्या कागदपत्रांवरून कळले आहे की तक्रारदार गेल्या ४० वर्षांपासून दररोज सुमारे १५ ते २० सिगारेट ओढत होता. या मुळं, पॉलिसीच्या अट क्रमांक ४.८ नुसार, हा दावा नाकारला जाऊ शकतो.पॉलिसीची अट सांगते की औषध/मद्य/ड्रगचा गैरवापर किंवा व्यसन झाल्यास दावा नाकारला जाऊ शकतो, असं युक्तिवाद विमा कंपनीने केला होता.

वाचाः देशात जीएसटी संकलनात तब्बल २२ टक्के वाढ; महाराष्ट्रातूनच सर्वाधिक ‘जीएसटी’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.