गवळी तिठा ते गांधी चौक या भागातून आदित्य ठाकरे यांचा रोड शो जाणार होता. मात्र या भागात असलेल्या दीपक केसरकर यांच्या घरासमोरून गेल्यास मोठा तणाव निर्माण होईल, अशी भीती पोलिसांना वाटली. यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी या भागातून रोड शो करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा सावंतवाडीतील रोड शो आता चिटणीस नाका ते गांधी चौक असा जाणार आहे.
हेही वाचा : राऊत नडले, भाजपला भिडले; नेमका कुठून सुरू झाला ‘सामना’? राजकारणातील लव्ह अन् हेट स्टोरी
दरम्यान दीपक केसरकर यांच्या होम पीचवर शिवसेना आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया विचारली असता, हे कट कारस्थानातून घडल्याचा आरोप आदित्य यांनी केला.
हेही वाचा : प्रभू रामचंद्रांच्या नावे पैसे खाणाऱ्या भामट्याला अजून पक्षातच ठेवणार? आचार्य तुषार भोसलेंचा सवाल
शिवसेनेची झालेली हानी भरुन काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चंग बांधला आहे. ज्युनिअर ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना भेटी देत असून तिथे भाषणंही ठोकत आहेत. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेरही आदित्य कारमधून उतरुन शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे. मात्र सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून निघणाऱ्या रॅलीला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिल्याने केसरकरांच्या घरासमोर शक्तीप्रदर्शन करता येणार नाही.
हेही वाचा : संजय राऊतांना अटक, शिवसेनेचा ‘आवाज’ आता कोण मांडणार? मातोश्रीवर फैसला