मुंबई: बॉलिवूडमधील जोड्यांपैकी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone and Ranveer Singh) या जोडीकडे चाहत्यांचं जरा जास्तच लक्ष असतं. ही जोडी एकत्र पाहण्यात चाहत्यांना आनंदच होतो. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगने न्यूड फोटो शूट (Ranveer Singh Nude Photoshoot) करून धुमाकूळ उडवला. त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. अनेक प्रतिक्रिया आल्या. पण या सगळ्यात रणवीरच्या या फोटोशूटवरून दीपिका नाराज तर नाही ना असाही प्रश्न चाहत्यांना भेडसावला. पण मनीष मल्होत्राच्या मिजवा या फॅशन शोसाठी दीपिका आणि रणवीर यांनी एकत्र रँपवॉक केलं. अशाप्रकारे एकत्र रँपवॉक करत जणू त्यांनी ‘मस्त चाललय आमचं’ हे कृतीमधूनच दाखवून दिलं.

हे वाचा-PHOTOS: सेक्सी असणं महत्त्वाचं, दिसणं नव्हे

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने त्याचं नवं कलेक्शन लाँच केलं. त्यासाठीच दीपिका आणि रणवीर रँपवर आले. एकमेकांचा हात धरून रँपवॉक करताना रणवीरने दीपिकाला किस केलं. शो पाहण्यासाठी समोर बसलेल्या आईलाही रणवीर नमस्कार करताना दिसला. रणवीरने त्याच्या खास अंदाजाने हा शो गाजवला तर दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. मनीषसाठी केलेल्या या रँपवॉकचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय.


मनीषच्या द मिजवा कलेक्शनमधील स्टायलीश लुकमुळे रणवीरवर त्याचे चाहते फिदा झाले आहेत. कुर्ता पायजमा आणि एम्ब्रायडरी केलेला कोट रणवीरने घातला होता. तर दीपिकाने क्रिस्टलवर्क केलेला घेरदार घागरा घातला होता. दोघांचाही रॉयल लुक खूपच भारी दिसत होता. या लुकमध्ये ही जोडी जेव्हा रँपवर आली तेव्हा शो पाहणाऱ्यांच्या नजरा त्यांच्यावरून हटता हटेनात. रँपवॉक करताना रणवीर दीपिकाच्या गालावर किस करत होता. त्यांची ही केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली.


रँपवॉक झाल्यानंतर रणवीरने समोर खुर्चीवर बसलेल्या आईकडे मोर्चा वळवला. तिथे जाऊन रणवीरने आईला वाकून नमस्कार केला आणि त्यांच्यावरही प्रेमाचा वर्षाव केला. रणवीरच्या या व्हिडिओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांना रणवीरचा हा अंदाज आवडला आहे तर काही जणांनी रणवीरच्या या वागण्याला ओव्हरअॅक्टिंगचं दुकान असं म्हणत ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलंय की न्यूड फोटोनंतर संस्कारी मुलगा दाखवण्याचा प्रयत्न आहे.


रणवीरबरोबरच दीपिकांच्या चाहत्यांनी तिला डोळे भरून पाहिलं. बऱ्याच दिवसांनी दीपिकाने रँपवॉक केलं आहे. अभिनयात येण्याआधी दीपिका एक मॉडेलच होती. दीपिकाच्या सौंदर्याचं चाहते कौतुक करताना दिसत आहेत, पण काही नेटकऱ्यांना दीपिकांची हेअरस्टाइल आवडली नाही.

हे वाचा-शिवानी सांगतेय खराब मूड छान करण्याचा रामबाण उपाय, ‘रानी’चा हा फंडा वाचाच!

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार हा सिनेमा फारसा चालला नाही. लवकरच तो रॉकी और रानी की प्रेम कहानी, सर्कस या सिनेमात दिसणार आहे. बैजू बावरा या सिनेमातही रणवीरची वर्णी लागली आहे. दीपिकाच्या पठाण या सिनेमाची उत्सुकता आहे, तर फायटर या सिनेमातही ती दिसणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.