मुंबई: अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत हैदराबाद इथं आगामी सिनेमा ‘प्रोजेक्ट के’ चं शूटिंग करतेय. शूटिंगदरम्यान अस्वस्थ वाटत असल्यानं तिनं रुग्णालयात धाव घेतली होती. त्यामुळं तिचे चाहते चिंतेत होते. दीपिकाच्या तब्येतीविषयी काही अपडेट्स आता समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी शूटिंग सुरू असतानाच दीपिकाला अशक्त वाटत होतं. तिचा हार्ट रेट वाढल्यामुळं तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण सततच्या शूटिंगमुळं तिला थकवा आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. ती रुग्णालयता आल्यानंतर तिच्यावर काही तास उपचार केले, त्यानंतर तिची तब्येत स्थिर झाली . त्यानंतर तिला डिस्चार्ज दिला, तिला अॅडमीट करण्यात आलं नव्हतं, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

शूटिंगवर परतली
आराम करेल ती दीपिका कसली. दीपिकानं सुट्टी न घेता चित्रपटाचं शूटिंग पुन्हा सुरू केलं आहे. अभिनेता आणि दीपिकाचा पती रणवीर सिंग देखील दीपिकाची काळजी करत असून फोन आणि मेसेज करून तो तिच्या संपर्कात आहे.

दीपिकाची तब्येत बिघडल्यानंतर पुढील उपचारांसाठी मुंबईला परतण्याची शक्यता वर्तवली होती. पण आता तिची तब्येत स्थिर असल्यानं तिनं तिथंच राहण्याला प्राधान्य दिलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.