नवी दिल्ली : भारताचा कर्णधार रोहित शर्माला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने फलंदाजी करत असतानाच मैदान सोडले होते. त्यानंतर रोहित पुन्हा मैदानात आला नाही. त्यामुळे रोहितची दखापत गंभीर असल्याचे समजले जात होते. पण आता शनिवारी होणाऱ्या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

वाचा-भारताचे अमेरिकेतील दोन्ही ट्वेन्टी-२० सामने नेमके किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…

कर्णधारपद स्विकारल्यावर खेळण्यापेक्षा जास्त सामन्यांमध्ये रोहितने विश्रांती घेतली आहे, असा आरोप त्याच्यावर केला जातो. पण तिसऱ्या सामन्यात जे घडलं ते सर्वांनीच पाहिलं आहे. फलंदाजी करत असताना रोहितच्या पाठीत उसण भरली होती आणि त्यामुळे त्याला उभं राहता येत नव्हतं. रोहितने एक षटकार आणि एका चौकारासह ११ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्या पाठीत दुखापयला लागले होते. रोहितला यावेळी उभंही राहता येत नव्हतं. त्यामुळे राखीव खेळाडूचा आधार घेत त्याने मैदान सोडलं होतं. पण आता रोहित चौथ्या खेळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल.

वाचा-भारत आणि वेस्ट इंडिजचे सामने अमेरिकेत का खेळवणार, जाणून घ्या यामागचं खरं कारण…

तिसऱ्या सामन्यात दुखापत झाल्यावर रोहित हा सत्कार समारंभासाठी मैदानात आला होता. त्यावेळी रोहितने आपल्या दुखापतीबाबत अप़ेट्स दिले होते. रोहितने त्यावेळी सांगितले होते की, ” माझी तब्येत आता ठीक आहे. सामना खेळत असताना पाठीमध्ये दुखत होते. पण आता मी बरा आहे. त्याचबरोबर तिसरा आणि चौथा सामना यामध्ये काही दिवसांचा अवधी आहे, तोपर्यंत मी पूर्णपणे फिट होईन.”

वाचा-भारताच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची मोठी चिंता अखेर मिटली

भारतीय संघ चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. त्याचबरोबर रोहितची दुखापत आता बरी झाल्याचेही सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे रोहित हा चौथ्या सामन्यात खेळणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे रोहित हा सामन्यात खेळू शकतो. पण आगामी विश्वचषक पाहता रोहितला जर थोडी विश्रांती घ्यावीशी वाटत असेल तर नक्कीच त्याला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते. पण हा निर्णय सर्वस्वीपणे रोहितचा असेल. रोहितला जर आपण पूर्ण फिट झालो नसल्याचे वाटत असेल तर तो हा सामना खेळणार नाही. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.