सेंट किट्स : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा ट्वेन्टी-२० सामंना आता रात्री १०.३० वाजता सुरु होणार आहे. पण हा सामना एवढ्या उशिरा का सुरु करण्यात येणार आहे, याचे कारणही आता समोर आले आहे.

वाचा-दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता वाढली, भारताला बसू शकतो मोठा फटका…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा त्रिनिदाद येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यानंतर भारतीय संघ सेंट किट्स येथे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी दाखल झाला. पण त्रिनादादवरून दोन्ही संघाचे सामना हे वेळेत सेंट किट्स येथे पोहोचू शकले नाही. कोणतेही सामान जवळ नसल्यामुळे सामना कसा खेळायचा हा खेळाडूंपुढे प्रश्न होता. त्यामुळे सामन्याची वेळ बदलण्यात आली. यापूर्वी हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरु करण्यात येणार होता. पण खेळाडूंचे सामान न आल्यामुळे हा सामना दोन तास उशिरा सुरु करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने घेतला होता. पण आता हा सामना अजून एक तास उशिराने म्हणजेच टॉस १०.३० वाजता होणार असल्याची माहिती मिळत आहेत.

वाचा-दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कोणाला मिळू शकते संधी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता सुरु झाले होते. त्यानंतर ट्वेन्टी-२० सामने हे ८.०० वाजता सुरु करण्याच ठरले होते. पण दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याची वेळ आता बदण्यात आली आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने ही माहिती दिली असून त्यांनी यासाठी सर्वांची माफीही मागितली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री १०.वाजता सुरु होणार असल्याचे आता समोर आले आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने यााबबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १०.०० वाजता सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले होते पण त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याची वेळ बदलण्यात आली. त्याच़बरोबर या गोष्टीबद्दल त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. कारण सामन्याची वेळ बदलली तर त्याचा परीणाम थेट प्रक्षेपण करणाऱ्या चॅनेलवर होत असतो. त्याचबरोबर अन्य बरेच विषय या एका गोष्टीशी निगडीत असतात. पण आता या सामन्याची वेळ बदलण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.