मुंबई :काॅफी विथ करण या शोमध्ये सगळ्यांनाच माहीत आहे की करण जोहर अडचणीत टाकणारे प्रश्न विचारत असतो. बरेच प्रश्न अगदी खाजगी असतात. सीझन ७ चा हा पाचवा एपिसोड मात्र अगदी हटके होणार, असं दिसतंय. यात लाल सिंग चड्ढा सिनेमाचे स्टार्स करिना कपूर आणि आमिर खान आले आहेत. समोर येणारे प्रोमो खूप मजेशीर आहेत.

एका प्रोमोत आमिर करणला विचारतो, तू दुसऱ्यांच्या सेक्स लाइफमध्ये एवढा का रस घेतोस? तुला तुझा आई दुसऱ्यांच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारायला थांबवच नाही का?

अमृतानं शेअर केला Video, ७५ वर्षांच्या ज्योती यांनी अभिनेत्रीला काय दिलं

आमिरनं करणच्या प्रश्नावर विचारला प्रतिप्रश्न
करण जोहरनं करिना कपूरला विचारलं की मुलं झाल्यानंतर सेक्स लाइफ कसं असतं? यावर करिना ताडकन म्हणाली, हे तुला चांगलंच माहीत असेल. कारण तुला जुळी मुलं आहेत. मग करण म्हणाला, तू माझ्या सेक्स लाइफबद्दल बोलतेस, सांभाळून, माझी आई हा शो पाहते. त्यावर गप्प बसेल तो आमिर कसला? त्यानं लगेच विचारलं, इतर लोकांच्या सेक्स लाइफबद्दल विचारताना तुझी आई काही बोलत नाही का तुला?


पुढे करिनानंही आमिरची खेचली आहे. ती म्हणते, याचा ड्रेस सेन्स सर्वात वाईट आहे. त्यावर आमिर म्हणतो, ही आज माझा सतत अपमानच करत आहे.

मी माझी ब्रा का लपवायची? आलिया भट्टचा रोखठोक प्रश्न, अभिनेत्रीला सेक्सिस्ट

करण जोहरचे सगळेच एपिसोड रंजक होत आहेत. अक्षय कुमार आणि सामंथाचा भाग चांगला रंगला होता. करणनं जेव्हा सामंथाला घटस्फोटाबद्दल विचारलेलं, तेव्हा ती म्हणाली घटस्फोट तुझ्याच सिनेमांमुळे होत असतात.

आलिया भट्टचा पहिला सिनेमा होता स्टुडंट ऑफ द इयर. तिचं बाॅलिवूड पदार्पण. त्यावेळी पहिल्यांदा आलिया करण जोहरच्या शोमध्ये आली होती. त्यावेळी तिला विचारलं होतं की तुझं स्वयंवर झालं, तर त्यात कोणी यावं असं तुला वाटतंय? त्यावर तिनं पहिलं नाव रणबीर कपूरचंच घेतलं होतं. त्यानंतर सलमान खान आणि आदित्य राॅय कपूरचं घेतलं होतं.

कॉफी विथ करण

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.