नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजला अजून एक धक्का देत मालिकेत २-० अशी आघाडी घेऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा असेल. त्यामुळेच या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल होऊ शकतात.

पहिला बदल
भारतीय संघाला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळालेली नाही आणि याचे कारण म्हणजे संघातील सलामीवीर बदलत आहे. कधी रिषभ पंत तर कधी सूर्यकुमार यादवला सलामीची संधी दिली गेली होती. पण या सामन्यात दमदार सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात इशान किशनचा समावेश केला जाऊ शकतो. कारण इशान हा एक दमदार सलामीवीर आहे आणि यापूर्वीही त्याने जबरदस्त सलामी दिल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे या सामन्यात इशानला भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. पण त्यासाठी सूर्यकुमार यादवला विश्रांती द्यावी लागणार आहे.

वाचा-दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला इतिहास रचण्याची संधी, रोहित शर्मा रचू शकतो मोठा विक्रम

दुसरा बदल
भारतीय संघात यावेळी फिरकी गोलंदाजीमध्ये एक मोठा बदल होऊ शकतो, असे संकेत मिळत आहे. पहिल्या सामन्यात आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि रवी बिश्नोई या तिघांना संधी देण्यात आली होती. पण या सामन्यासाठी भारतीय संघात आता कुलदीप यादवचा समावेश केला जाऊ शकतो. पण जर कुलदीपला संघात स्थान द्यायचे असेल तर या तिघांपैकी कोणत्या फिरकीपटूला संघाबाहेर काढायचे, हा मोठा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.

वाचा-IND vs WI: रोहित शर्मा आज ठरवूनच मैदानात उतरणार; पाकिस्तानचा महा’रेकॉर्ड’ धोक्यात

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याचा टॉस हा संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने सामना सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना रात्री ८.०० वाजता सुरु होणार आहे. वनडे सामन्यांपेक्षा हे ट्वेन्टी-२० सामना एक तास उशिराने सुरु होणार आहेत. हे ट्वेन्टी-२० सामने रात्री ८.०० ते १२.०० या कालावधीत होतील, असे म्हटले जात आहे. पण जर पावसाने खोडा घातला तर हे सामने उशिरा संपू शकतात.

भारताचा संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.