सेंट किट्स : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याचा टॉस वेस्ट इंडिजने जिंकला. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पुरनने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. रोहित शर्माने यावेळी दुसऱ्या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर केला आणि यामध्ये एकमेव मोठा बदल करण्यात आला.

भारतीय संघाने या सामन्यात एकमेव बदल केला. रवी बिश्नोईला या सामन्यासाठी वगळण्यात आले असून वेगवान गोलंदाज अवेश खानला संधी देण्यात आली आहे. दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा भारतासाठी महत्वाचा आहे. कारण हा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेत २-० अशी आघाडी घेऊ शकतो. त्याचबरोबर या मैदानात भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार आहे. त्यामुळे या पहिल्याच सामन्यात भारतीय संघ विजय मिळवत इतिहास रचणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

वाचा-दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता वाढली, भारताला बसू शकतो मोठा फटका…

पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय साकारला खरा, पण त्यावेळी एक गोष्ट जास्त लोकांच्या ध्यानात आली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माची चिंता वाढलेली आहे. कारण पहिल्या सामन्यात रोहितने दमदार अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी रोहितबरोबर सलामीला सूर्यकुमार यादव आला होता. या सामन्यात सूर्यकुमारला दमदार फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे एका गोष्टीचा निकाल आता भारतीय संघाला लावावा लागणार आहे. जर बदल केला नाही तर भारताला मोठा फटका विश्वचषकात बसू शकतो. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठा बदल होऊ शकतो, असे म्हटले जात होते. सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला या सामन्यात संधी मिळू शकते, असे म्हटले जात होते.

वाचा-दुसरा ट्वेन्टी-२० सामना रात्री १०.०० वाजता का सुरु करण्यात येणार, समोर आले मोठे कारण…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना हा त्रिनिदाद येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यानंतर भारतीय संघ सेंट किट्स येथे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी दाखल झाला. पण त्रिनादादवरून दोन्ही संघाचे सामना हे वेळेत सेंट किट्स येथे पोहोचू शकले नाही. कोणतेही सामान जवळ नसल्यामुळे सामना कसा खेळायचा हा खेळाडूंपुढे प्रश्न होता. त्यामुळे सामन्याची वेळ बदलण्यात आली. यापूर्वी हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरु करण्यात येणार होता. पण खेळाडूंचे सामान न आल्यामुळे हा सामना दोन तास उशिरा सुरु करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने घेतला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.