वाचा: iPhone 14 च्या लाँचआधी iPhone 13 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, किंमत पाहून विश्वास बसणार नाही
भारतात यूजर्सला आज सकाळी पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट पाठवताना व रिसिव्ह करताना समस्या येत होती. अॅप व वेबसाइट वापरताना देखील अडथळा येत होता. पेटीएम वॉलेटच्या माध्यमातून देखील पेमेंट करणे शक्य होत नव्हते. अकाउंट आपोआप लॉग आउट होत आहे. यूजर्सला पुन्हा पेटीएमवर अकाउंट लॉगइन करावे लागत आहे. तसेच, अनेबल टू सेंड मनी असा मेसज दिसत आहे. यूजर्सला अॅपचा वापर करताना समस्या आल्यानतंर अखेर पेटीएमने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. पेटीएमने म्हटले आहे की, अॅपवर काही नेटवर्क एरॉर आहे. टीम यावर काम करत असून, लवकरच सेवा पुन्हा एकदा सुरू होईल.
पेटीएम डाउन झाल्यानंतर यूजर्सने ट्विट करत याबाबत तक्रार केली.
इंस्टाग्राम आणि ट्विटर देखील झाले होते ठप्प
दरम्यान, गेल्या महिन्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि ट्विटरची सेवा देखील ठप्प झाली होती. १९ जुलैला इंस्टाग्राम डाउन झाले होते. यूजर्सला टाइमलाइन अपडेशनमध्ये समस्या येत होती. तर १४ जुलैला ट्विटर देखील डाउन झाले होते. अनेक यूजर्सने याबाबत इतर प्लॅटफॉर्मवर तक्रार केली होती.
वाचा: एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह Noise Smartwatch भारतात लाँच, किंमत खूपच कमी
वाचा: Google कडे तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे कशी काय असतात? जाणून घ्या