बालहक्क आयोगाची सरकारला विचारणा

वृत्तसंस्था, नवी दिल्लीः देशात पबजीवर बंदी असतानाही हा खेळ बालकांना कसा उपलब्ध होतो, अशी विचारणा राष्ट्रीय बालहक्क आयोगाने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे केली आहे. पबजी खेळण्यास मनाई केल्यामुळे एका १६ वर्षांच्या मुलाने आईचा गोळ्या घालून खून केला होता. त्या संदर्भात आयोगाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

सरकारने पबजी व काही अन्य खेळांवर २०२०मध्ये बंदी घातली. हे खेळ देशाची एकता, सार्वभौमता आणि संरक्षण यासाठी धोकायदायक असल्याचे सरकारने त्या वेळी म्हटले होते. तरीही लखनौमध्ये गेल्या आठवड्यात मुलाने आईची हत्या केल्याची घटना घडली.

वाचाः बँक मॅनेजर विजय कुमारच्या हत्येचा सैन्याने १३ दिवसात घेतला बदला; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
या घटनेबाबत आयोदाने मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले, आहे की बंदी घालण्यात आलेला खेळ मुलांना कसा उपलब्ध होतो, हे आमच्या समजण्यापलीकडे आहे. आपल्या अधिकाऱ्यांना या मागील कारणे स्पष्ट करण्यास सांगावे. लखनौसारख्या घटनांबाबत कोणती पावले उचलली, याचा अहवाल १० दिवसांत सादर करावा, असेही आयोगाने म्हटले आहे.

वाचाः सशस्त्र दलांसाठी ‘अग्निपथ’ धोक्याची घंटा ठरण्याची निवृत्त अधिकाऱ्यांकडून भीतीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.