प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. त्याच्यासाठी यू मुंबा आणि तमिळ थलायवास यांच्यात जबरदस्त चुरस रंगली. पण अखेर तामिळ थलायवासने बाजी मारली त्याला मोठी रक्कम देऊन विकत घेतले.
वाचा – फक्त ३० सेकंदांमध्ये दिव्याने जिंकलं पदक, भारतीय कुस्तीपटूंचा एकाच दिवसात पदकांचा षटकार
आजवर भारतात क्रिकेटपटूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडायचा पण आता कबड्डीपटूही करोडोंमध्ये खेळू लागले आहेत. यामुळेच महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील स्वतःला ट्विट करण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांनी ट्विट केले की, “प्रो-कबड्डीमध्ये खेळाडूंच्या लिलावात इतिहास रचला गेला आहे. पवन सेहरावतसाठी २.२६ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावण्यात आली आहे. जेव्हा आम्ही ही लीग सुरू केली तेव्हा कधी स्वप्नातही वाटले नव्हते की भारताच्या देसी खेळात इतक्या लवकर खेळाडू नाव आणि पैसा मिळवतील.”
वाचा – दुखापतीनंतर रोहित शर्मा चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळणार की नाही, जाणून घ्या इनसाइड स्टोरी
ट्विटरवर ९.५ दशलक्ष फॉलोअर्स
महिंद्रा सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर त्यांचे तब्बल ९५ लाख फॉलोअर्स असून ते दररोज प्रेरणादायी आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत असतो. महिंद्रा यांना खेळात प्रचंड रस आहे. त्यांनी २०१४ मध्ये क्रीडा समालोचक चारू शर्मासोबत इंडियन प्रोफेशनल कबड्डी लीगची सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षांत त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. याशिवाय गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक खेळातील पदक विजेत्यांना महिंद्राची गाडी भेट म्हणून दिली होती.