इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये गेल्या २० दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान सरकारने बुधवारी २४ रुपयांनी वाढ केली. ताज्या दर वाढीमुळे एक लीटर पेट्रोलच्या किमती २३३.८९ रुपयांवर गेल्या आहेत.

पाकिस्तानचे अर्थमंत्र्यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पेट्रोलची ताजी दरवाढ ही २४.०३ रुपयांची आहे. तर डिझेलच्या किमतीत १६.३१ रुपायंची वाढ होत ते दर २६३.३१ रुपये लिटरवर पोहोचली आहे. सरकारने फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नाही तर रॅकेलच्या दरात देखील २९.४९ रुपयांची वाढ केली आहे. पाकिस्तानमधील नागरिकांना लीटरमागे २११.४७ रुपये मोजावे लागतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती वाढल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

वाचा- ‘पाकिस्तानींनो, चहा कमी प्या’; आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी माजी मंत्र्यांचा अजब सल्ला

पाकिस्तान सरकारने २० दिवसांपूर्वी पेट्रोलच्या किमतीत ८४ रुपयांची वाढ केली होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती १२० डॉलरवर पोहोचल्या होत्या. पाकिस्तान सरकारला पेट्रोलमध्ये २४.०३, डिझेल मागे ५९.१६ तर रॉकेलमागे २९.१६ रुपये इतका तोटा होत आहे. सरकारने पेट्रोल सबसिडीवर आतापर्यंत १२० अब्ज रुपये खर्च केला आहे.

वाचा- हवाई इंधनाने भाव गगनाला भिडले; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अशात एका माजी मंत्र्याने देशातील नागरिकांना चहा कमी पिण्याचा सल्ला दिलाय. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पाकिस्तानने चहावर ८३.८८ अब्ज रुपये (४०० दशलक्ष डॉलर) खर्च केल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे नियोजनमंत्री एहसान इक्बाल यांनी हा सल्ला दिलाय. ‘पाकिस्तान संपूर्ण जगात चहाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि आता चहा आयात करण्यासाठी त्याला कर्ज द्यावे लागत आहे,’ असे ते म्हणाले.

वाचा- भारतासाठी वाईट बातमी; अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने गेल्या २८ वर्षात असा निर्णय घेतला

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.