मुंबई: शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन शिवसेना प्रमुख बाळाबाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांचा उल्लेख केला. यावेळी विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याने दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तरीही त्यांनी कुठलेही रुसवे फुगवे न करता माझा आदेश म्हणून प्रत्येक गोष्ट मान्य केली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना स्थापनेच्या क्षणाची आठवण

“५६ वर्षातल्या अनेक गोष्टी आजही मनात ताज्या आहेत. जेव्हा मी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची शपथ घेतली तेव्हा एक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळला. तो म्हणजे ५६ वर्षांपूर्वीचा शिवसेनेच्या स्थापनेचा तो क्षण, शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, माँ, काका, आम्ही तीन मुलं होतो. तेव्हा वेळकाळ दिवस न बघता शिवसेनेची स्थापना करण्यात आली. त्या क्षणावेळी साक्षीदार मी आणि आणखी माझ्या कुटुंबातील एक-दोन जण असतील. माझं वय ६ वर्षांचं होतं. शिवाजी महाराज की जय म्हणून शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फुटला. त्या नारळाच्या पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले, तेव्हा जोश होता, गंमत होती. तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते शिंतोडे मला इतकं भिजवतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा –भाडोत्री सैन्य हा काय प्रकार? असंच जर असेल तर भाडोत्री राज्यकर्ते आणा, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

“फार मोठी जबाबदारी, हे तेव्हा कळलेच नाही. शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेनेचं काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, त्याला आपण नुसतच नाही तर कणखरपणे उत्तर देत आलो आहोत. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काही आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावते पहिल्या पिढीचे शिवसेना प्रमुखाचे साथी आहेत. तेव्हा शिवसेना मुख्यमंत्री असेल हे स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ मध्ये होणं हेच खूप मोठं वैभव होतं. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत, मंत्रीपद आपल्याकडे आहे. अशावेळी हे दोन्ही शिवसेनाप्रमुखांचे दोन्ही साथी, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना पावलावरती साथ दिली. यावेळी जबाबदारी माझी आहे. मी त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाही दिली. तरीही कुठेही धुसफूस, रुसवे फुगवे न दाखवता दोघेही त्याच उमेदीने त्याच जिद्दीने जणूकाही आज हे शिवसेनेच्या प्रवेशासाठी आले आहेत, त्याच उत्साहाने ते मंचावर आहेत”, असं म्हणत त्यांनी दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्यासाठी कौतुकोद्गार काढले.

हेही वाचा – मतांसाठी धावाधाव, एकनाथ खडसे किंगमेकर हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला

“याला शिवसैनिक म्हणतात. स्वत:साठी स्वप्न बघणं हे सगळ्यांसाठी असतं पण दुसऱ्यासाठी स्वप्न बघणं आणि ते साकारण्यासाठी झटणं याला शिवसैनिक म्हणतात. या दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले. मी सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत, पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – भाडोत्री सैन्य हा काय प्रकार? असंच जर असेल तर भाडोत्री राज्यकर्ते आणा, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

अयोध्येत ‘महाराष्ट्र सदना’साठी उद्धव ठाकरे योगींशी बोलणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.