बर्मिंगहम : भारताच्या बॉक्सिंगपटूंनी आता राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार पावले टाकली आहेत. कारण आता भारताचे बॉक्सिंगपटू १-२ नाही तर तब्बल सहा पदकं जिंकत मेडल्सचा षटकार मारणार आहेत. भारताला कोणते सहा खेळाडू पदकं जिंकवून देणार आहेत, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.

अमित पंघलने गुरुवारी कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनविरुद्ध त्याच्या फ्लायवेट (४८-५१ किलो) उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून बॉक्सिंग रिंगमधून भारतासाठी सहावे पदक निश्चित केले. भारताचा हा सामना एकतर्फी झाली आणि त्यामुळेच अमितला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. पंघलने गेल्या गोल्ड कोस्टमध्ये रौप्य पदक जिंकले होते. या लढतीत जास्त चढाओढ पाहायला मिळाली नाही. कारण सुरुवातीपासूनच अमित हा आक्रमक खेळ करत होता. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला जास्त संधीच दिली नाही. अमितच्या आक्रमणापुढे त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने हार मानल्याचे पाहायला मिळाले. अमितने यावेळी चांगले आक्रमण केले, पण त्याचबरोबर त्याचा बचावही उत्तम होता.

भारताच्या बॉक्सर्ससाठी आजचा दिवस चांगलाच यशस्वी ठरला. कारण आज फक्त अमितनेच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला नाही, तर भारताच्या सागर आणि जयस्मिन यांनीही दमदार विजय मिळवत आपेल उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. सागरने सेशेल्सच्या केडी इव्हान्स अॅग्नेसवर एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना भारतासाठी चांगलाच रंजकदार ठरला. सागर अहलावतने बॉक्सिंगमध्ये भारताची पदकांची घौडदौड कायम ठेवली, गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ९२पेक्षा जास्त किलो वजनी गटात सेशेल्सच्या केडी इव्हान्स अॅग्नेसवर वर्चस्व राखून उपांत्य फेरीत मजल मारली. हरियाणाच्या २२ वर्षीय खेळाडूने सुपर हेवीवेट उपांत्यपूर्व फेरीत इव्हान्सवर ५-० असा विजय मिळवून बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढवली.

अमित आणि सागर यांच्याबरोबर जयस्मिननेही आज विजय साकारला. महिलांच्या ५७-६० किलो वजनी गटामध्ये जयस्मिनने ट्रॉय गॉटर्नवर ४-१ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीसह भारताचे पदक निश्चित केले. या तिघांबरोबरच निखत झरीन (५० किलो), नितू गंगास (४८ किलो) आणि मोहम्मद हुसमुद्दीन (५७ किलो) यांनीही आपापल्या गटात पदकांची निश्‍चिती करण्यासाठी उपांत्य फेरी गाठली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.