मुंबई: झी मराठीवरील ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत आहे. दरम्यान ‘बस बाई बस’मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis in Bus Bai Bus) यांनी उपस्थिती दर्शवली. अमृता फडणवीस यांचे या कार्यक्रमातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात सहभागी महिलांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देताना अमृता फडणवीस दिसत आहेत.

विविध क्षेत्रातील लोकप्रिय महिला या ‘बस बाई बस’मध्ये सहभागी होणार आहे. अमृता फडणवीस यांच्याआधी या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या दोन्ही भागांमध्ये राजकारणाविषयी खमंग गप्पा ऐकायला मिळाल्या.

हे वाचा- पतीच्या निधनानंतर दोनच दिवसात कामावर परतली अभिनेत्री; काय आहे कारण?

सामान्यांना राजकारण्यांच्या आयुष्याविषयी काही प्रश्न नक्कीच पडतात. यापैकी एक सवाल म्हणजे विविध मंत्र्यांच्या पत्नींचं एकमेकींशी पटतं का? असाच सवाल या कार्यक्रमात अमृता यांना विचारण्यात आला. अमृता फडणवीस यांना असं विचारण्यात आलं की, २ मंत्र्यांच्या बायकांचं एकत्र जमतं का? यावर अमृता यांनी असं उत्तर दिलंय की, ‘कोणत्याही मंत्र्याच्या पत्नीला घराबाहेर पडण्यासाठी तेवढा वेळच मिळत नाही. सतत घरात काहीतरी कामं येतं. पण एक सांगेन की दोन मंत्र्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकींशी जमतं.’


हे वाचा-शर्मनच्या निधनाची उडाली अफवा, सासऱ्यांबद्दलही पसरलेली खोटी बातमी

या कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली होती. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. शिवाय अमृता यांच्यावर टीका देखील केली जात आहे. कार्यक्रमात एक गाणं ऐकवण्यात आले आणि त्यानंतर कोणाचा चेहरा आठवतो असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असे विधान केले. अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात ‘कशी नशिबाननं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकवण्यात आले होते. अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.