Airtel SIM अॅक्टिवेट ठेवण्यासाठी बेस्ट प्लान्स
कंपनीकडे तीन प्रीपेड प्लान आणले आहे. याची किंमत ९९ रुपये, १०९ रुपये, आणि १११ रुपये आहे. हे प्लान कमी पैशात मोठी वैधता, टॉकटाइम, SMS आणि डेटा सोबत येतात.
Airtel 99 चा प्लान
९९ रुपयाच्या या प्लान सोबत एअरटेल ९९ रुपयाचा टॉकटॉइम, 200MB डेटा आणि २८ दिवसाची वैधता मिळते. यूजर्संना २.५ पैसे प्रति सेकंद या रेटने लोकल आणि एसटीडी कॉल करता येवू शकते. एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडीसाठी १.५ रुपये मोजावे लागेल.
Airtel 109 रुपयाचा प्लान
१०९ रुपयाचा प्रीपेड प्लान सुद्धा ९९ रुपयाचा टॉकटाइम, 200GB डेटा सोबत येतो. या प्लानची वैधता २८ दिवसाच्या ऐवजी ३० दिवसाची आहे. कॉलिंग शुल्क ९९ रुपये प्लान सारखे आहे.
Airtel 111 रुपयेचा प्लान
१११ रुपयाचा एअरटेल प्रीपेड प्लान मध्ये ९९ रुपयाचा टॉकटाइम, 200GB डेटाचा समावेश आहे. यात महिनाभराची वैधता मिळते. १११ रुपयाच्या प्लानला ६ जुलैला रिचार्ज केल्यास पुढील तारीख ६ ऑगस्ट, ६ सप्टेंबर याप्रमाणे येईल.
वाचाः महागड्या रिचार्जची नाही गरज, सुमारे १०० रुपयांत महिनाभर SIM अॅक्टिव्ह ठेवतात ‘हे’ प्लान्स
वाचाः Boult Audio ने लाँच केले ३२ तास नॉन-स्टॉप चालणारे इयरबड्स, किंमत फक्त २,४९९ रुपये