नवी दिल्ली: इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे हे भारतीय संघासाठी अभिमानाची गोष्ट असेल. गेल्या वर्षी झालेल्या ४ पैकी २ सामन्यात विजय मिळून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पाचवी कसोटी करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ती पुढील महिन्यात होणार आहे. भारताकडे ही मालिका जिंकण्याची ऐतिहासिक संधी आहे. त्यासाठीच बीसीसीआयने द.आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत (IND vs SA T20 Series) नियमीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्माच्या जागी बोर्डाने कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे दिली. पण मालिका सुरू होण्याच्या आधीच तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे बोर्डाने ऋषभ पंतकडे नेतृत्व सोपवले. तर हार्दिक पंड्याला उपकर्णधारपद दिले. भारताने पहिल्या टी-२० सामन्यात २११ धावांचा डोंगर उभा करून देखील त्यांचा पराभव झाला.

भारतीय संघाच्या या पराभवाने अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्यांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. या प्रश्नांमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संघाचे कर्णधारपद होय. संघातील उपलब्ध खेळाडूंपैकी पंत हा सर्वात चांगला पर्याय होता का? संघात हार्दिक पंड्या सारखा खेळाडू होता आणि गेल्याच महिन्यात त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने दिग्गज संघांचा पराभव करून आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.

हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२ मध्ये फक्त चांगले नेतृत्व केले नाही तर फलंदाजी आणि गोलंदाजीत देखील कमाल करून दाखवली. आयपीएल लिलावाच्या वेळी अनेकांनी गुजरात संघावर पराभूत झालेला संघ अशी टीका केली होती. पण कागदावर कमकूवत वाटणारा संघ हार्दिकच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन झाला. हार्दिकने संघाकडून सर्वाधिक ४८७ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला पंतकडे एक चांगला संघ होता. एवढंच नाही तर रिकी पॉन्टिंग सारखा दिग्गज माजी खेळाडू होता. तरी देखील दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने १४ पैकी ७ सामन्यात विजय मिळवला. दिल्लीला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दबाव हाताळता येत नाही

रिकी पॉन्टिंग आणि बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी अनेक वेळा ऋषभ पंतच्या नेतृत्वाचा कौतुक केले आहे. पण त्याने आजवर फार कमाल करुन दाखवली नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्ध ज्यापद्धतीने मैदानावरील पंचांचा निर्णय आवडला नाही म्हणून खेळाडूंना बाहेर बोलवले होते. डगआउटमध्ये असलेल्या शेन वॉटसनने तेव्हा त्याला रोखले होते. अशा परिस्थितीत पंत जर कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकत नसेल तर त्याला विकेटकीपर आणि फलंदाजाच्या भूमिकेत ठेवले पाहिजे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.