मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमानं आतापर्यंत सर्वांचं निखळ मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमानं सर्वांना खळखळून हसवलं आहे. परंतु या कार्यक्रमानं काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. त्याच्या जागी आता ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. मात्र, प्रेक्षकांना द कपिल शर्मा शो ची उणीव प्रकर्षानं जाणवते आहे.

मूसेवाल्याच्या मारेकऱ्याची सलमानला नाही भीती, उघडपणे सुरू शूटिंग

कपिल शर्मा (Kapil Sharma) याला खूपच प्रसिद्धी मिळाली आहे. कपिलनं ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ (The Great Indian Laugher Challenge) कार्यक्रमातून मनोरंजन विश्वात त्याती विनोदाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. परंतु त्याला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल’ (Comedy Nights With Kapil) कार्यक्रमातून मिळाली.


हा कार्यक्रम २०१३ पासून कलर्सवरून प्रसारित केला जात होता. परंतु हा कार्यक्रम मध्येच बंद करण्यात आला. परंतु त्यानंतर हा कार्यक्रम सोनी टीव्हीवरून ‘द कपिल शर्मा शो’ या नावानं प्रसारित केला जाऊ लागला. अल्पावधीत हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. कार्यक्रमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं जातं आहे. आजमितीला हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांमधील एक आहे. दिवसागणिक कार्यक्रमाची लोकप्रियता वाढीस लागली आहे. इतकेच नाही तर सर्वाधिक कमाई करणारा कार्यक्रम म्हणून याची नोंद झाली आहे.

माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे…मिताली नव्हे तर या अभिनेत्रीची सिद्धार्थसाठी खास पोस्ट

कोट्यवधी रुपये मानधन घेतो कपिल शर्मा

सध्याच्या काळात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या विनोदी अभिनेत्यांमध्ये कपिल शर्माची गणना केली जाते. ‘द सियासत डेली’ च्या रिपोर्ट्सनुसार कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) च्या तिसऱ्या पर्वासाठी लाखो रुपये मानधन म्हणून घेतो. या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दुसऱ्या सिझनसाठी कपिल एका भागासाठी ३० लाख रुपये मानधन घ्यायचा.


तिसऱ्या सिझनसाठी त्यानं मानधनात वाढ केली आणि एका भागासाठी तो ५० लाख रुपये मानधन आकारत होता. अर्थात एका आठवड्यासाठी तो १ कोटी रुपये मानधन घ्यायचा. कपिलच्या कार्यक्रमाचे तिसरे पर्व आता संपले आहे. कार्यक्रमाच्या या पर्वाचे ८० भाग आतापर्यंत प्रसारित झाले आहेत. या सर्व भागांसाठी कपिलनं जे मानधन आकारलं आहे, त्याचा आकडा थोडाथोडका नाही तर हा चक्क ४० कोटी रुपयांच्या घरात जातो.

२२ लाखांची बाइक ते १.५ कोटींची कार, सुशांतसिंह राजपूतला होतं लग्झरी गाड्यांचं वेड

सर्वाधिक कर भरतो कपिल

जानेवारी २०१ मध्ये अशीही बातमी आली होती कपिल शर्मानं त्यावर्षात १५ कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला होता. ही गोष्ट खुद्द कपिलनंच त्याच्या कार्यक्रमात सांगितली होती. त्यानं सांगितलं होतं की प्रत्येकानं इन्कम टॅक्स भरायलाच हवा कारण त्यानं आपल्या देशाचा विकासात मदत होते. त्या भागामध्ये ऐश्वर्या राय प्रमुख पाहुणी म्हणून आली होती.


कपिल शर्मा टीमबरोबर गेला अमेरिकेत

कपिल शर्माच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या तो चंदन प्रभाकर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि सुमोना चक्रवर्ती यांच्याबरोबर अमेरिका आणि कॅनडा इथं कार्यक्रमासाठी गेले आहेत. त्यांचा हा दौरा काही महिन्यांसाठी आहे. आता त्याच्या कार्यक्रमाबद्दल असंही सांगितलं जात आहे की, कार्यक्रम ओटीटीवर प्रसारित केला जाणार आहे. अर्थात याबाबत कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. परंतु लवकरच त्यासंदर्भात घोषणा केली जाईल.

शिव ठाकरे एन्जॉय करतो लेह-लडाख ट्रीप

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.