क्लिक करा आणि वाचा- विधान परिषदेची धामधूम, नेत्यांच्या जोरबैठका, बच्चू कडू टपरीवर, पाण्यासोबत पारलेजीचा आस्वाद
या मारहाणीनंतर काही वेळाने भांडण शांत झाले. त्यानंतर अशोक हे झोपी गेले. मात्र मारहाणीत लागलेल्या मुक्यामाराने अंतस्राव झाल्याने चिदानंद शिवकरण यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीय चिदानंद यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. चिदानंद यांना डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी चिदानंद यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
क्लिक करा आणि वाचा- चिंता कायम, राज्यात करोना रुग्णसंख्या पुन्हा ४ हजारांवर, मुंबईत २०८७ नवे रुग्ण
हा मृत्यू प्रथमदर्शी नैसर्गिक असल्याचे सर्वांना वाटले. मात्र, शवविच्छेदन अहवाल आला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. याचे कारण म्हणजे मुलाच्या मारहाणीत चिदानंद यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. यानंतर पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चिदानंद यांचा पुत्र अशोक याला अटक करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई पोलिसांची ‘संडे स्ट्रीट’ संकल्पना; अक्षय कुमार, गृहमंत्री वळसे पाटील, CP संजय पांडे, नांगरे पाटलांची उपस्थिती