भंडारा : थंड हवा देणारा कुलर किती धोकादायक आहे, याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार भंडाऱ्यामध्ये समोर आला. इथं फरशी साफ करताना कुलरमधील विजेचा जबर धक्का लागून तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव इथं घडली आहे. सुचिता धनपाल चौधरी (वय २२, रा. पाहुणगाव) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती सकाळी आपल्या घरात साफसफाईचं काम करीत होती. घरात लावलेल्या कुलरजवळची जागा स्वच्छ करत असताना तिचा स्पर्श कुलरला झाला. मात्र, या कुलरमध्ये वीज प्रवाहित असल्याने विजेचा जबर धक्का लागून ती कोसळली आणि बेशुद्ध पडली.

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी Good News, आजपासून ‘हा’ पूल वाहतुकीस खुला
सुचिता कोसळताच घरात एकच हलकल्लोळ झाला. लागलीच तिला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ट्रिपल मर्डरने महाराष्ट्र हादरला! घरात आईचा खून तर दोन मुलांना विहिरीत ढकललंSource link

Leave a Reply

Your email address will not be published.