अकोला : ‘मला मारहाण केली, माझी बदनामी झाली’, असा व्हिडीओ काढून दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आमच्या मुली सोबत का बोलतो म्हणून सहा लोकांनी एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर माझा अपमान झाला, मला रहा वाटत नाही, असे म्हणत या अल्पवयीन मुलाने राहत्या अपार्टमेंट’च्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली. ही घटना अकोला शहरातील जठारपेठ भागातील महर्षी अपार्टमेंटमध्ये घडली. अखेर सिव्हिल पोलिसांनी याप्रकरणी सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय सुभाष मुदगल (वय १७ रा. जठारपेठ महर्षी अपार्टमेंट) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अक्षयने तो राहत असलेल्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मुलीशी बोलला म्हणून माझ्या मुलाला सहा लोकांनी मारहाण केल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. या याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

क्लिक करा आणि वाचा- महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात काय आहे पावसाचा अंदाज?

येथे झाली होती मारहाण

२६ एप्रिल रोजी काही जणांनी अक्षयला दत्त मंदिराजवळ मारहाण केली. त्यानंतर तो घरी आला आणि त्याने त्याच्या मावसभावाला फोन करून आत्महत्या करतो असे सांगितले. त्यानंतर दुपारी त्याने टोकाचे पाऊल उचचले. या प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

आत्महत्येपूर्वी ‘अक्षय’ने बनवला व्हिडिओ

मृत्यूपूर्वी त्याने एक व्हिडिओ काढला. त्यात तो रडत आहे आणि आपल्याला मारहाण केल्याने बेइज्जती झाली, आता मी आत्महत्या करतो, असे त्याने त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे, ‘माझा अपमान झाला’ मला रहावे वाटत नाही’, असही त्याने म्हटले आहे.’ माझ्या डोक्याला मारले, डोळ्यावर मारले, तेव्हा खूप लोक होते. माझी बदनामी झाली, आता चाललोय, कधीच परत येणार नाही’, असे अक्षयने पुढे व्हिडिओत म्हटले आहे. मात्र, अद्याप मारेकरी लोकांची ओळख समोर आली नाही.

क्लिक करा आणि वाचा- अकोल्यातील गावकऱ्यांची गांधीगिरी; रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

या सहा लोकांकडून झाली मारहाण

अनिल गावंडे, सुमित गावंडे, प्रवीण गावंडे, विजय लोडम, सचिन निमबर्ड आणि छोटू पांडे या लोकांनी आमच्या मुलीशी बोलतो म्हणून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर त्यांने आत्महत्या केली. अखेर सिव्हिल लाइन पोलिसांनी या सहां लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सद्यस्थितीत या याप्रकरणी एकालाही अटक केली नसून पुढील तपास सुरू आहे.

क्लिक करा आणि वाचा- विक्रमी रस्ता बांधकाम सुरू, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद

आई-वडील चालवतात रसवंती

अक्षयचे आई-वडील रसवंती चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने या प्रकरणी कुणीही गांभीर्य दाखवले नसल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. अखेर आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.