अमरावती: सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात आता एक मोठी चिंता निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात विशेष म्हणजे आता राज्यापुढे एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता अमरावती जिल्हातूनही एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार अमरावती जिल्ह्यातून गेल्या तीन महिन्यात तब्बल २७२ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर अमरावती विभागातील आकडा तब्बल ८१२ इतका आहे. अमरावती विभागात बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा –तीन सख्ख्या बहिणींचा एकत्र गळफास, मध्यरात्री मुली अंधरुणात नाही म्हणून आईने…

महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना या नव्या नाहीत. राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. पोलीस महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. पण, तरीही महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. विशेष म्हणजे आता राज्यापुढे एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

अमरावती जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला

अमरावती जिल्ह्याची धुरा ही महिलांच्या हाती आहे खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंग, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर (सध्या पद रिक्त) यांसह विविध महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असताना सुद्धा अमरावती जिल्ह्यात महिला अत्याचारात झालेली वाढ आणि बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींची संख्या ही चिंताजनक आहे.

हेही वाचा –सोलापुरातील व्यक्तीचा पुण्यात खून, धारदार शस्त्राने भोसकलं, भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात

पुणे जिल्ह्यात ८४० महिला बेपत्ता

विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात गेल्या ७ महिन्यात ८४० महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्या पाठोपाठ आता अमरावती जिल्ह्यातून देखील अशीच काहिशी माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात तब्बल २७२ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर अमरावती विभागातला हा आकडा तब्बल ८१२ इतका आहे. अमरावती विभागात बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याचा आकडा हा धक्कादायक आहे.

तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक

महाराष्ट्रामध्ये महिला आणि तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी कित्येक मुलींचे कुटुंबीय पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे बेपत्ता होणाऱ्या मुलींची खरी आकडेवारी बाहेर येणे शक्य नाही. यापैकी काही तरुणी आणि महिला घरी परतल्या असतील. काही पळून गेल्यानंतर लग्न करुन परतल्या असतील किंवा आई-वडिलांच्या संमतीने त्यांचे पळून गेलेल्या मुलांसोबत लग्न लावून दिले असेल. पण, ज्या मुली आणि महिला घरी परतल्याच नाही त्यांचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागलेला नसल्याने चिंतेचे ढग अजून गडद झाले आहे.

हेही वाचा –भीषण! भररस्त्यात तरुणावर ३५ वेळा वार, पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला, पुण्यात हत्येचा थरार

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग व उपायुक्त विक्रम साडी यांच्याशी संपर्क केला असता सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

मुलासाठी आईची तगमग; आजारी मुलासह टायरवर बसून पुरातून काढला मार्गSource link

Leave a Reply

Your email address will not be published.