बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील तीन शेतकरी आपल्या २२६ मेंढ्या घेऊन परभणी तालुक्यातील भारसवाडा शिवार मध्ये आले आहेत. नियमितपणे त्यांनी मेंढ्या चरण्यासाठी सोडली असता मेंढ्यानी विषारी वनस्पती खाल्ली त्यामुळे मेंढ्यांना विषबाधा झाली. यात ४५ ते ५० मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा- मिळालेली गुप्त माहिती खरी निघाली; छापेमारीत हाती लागले मोठे घबाड
मेंढ्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी भारसवाडा येथे उपचार सुरू केले आहेत. सध्या स्थितीला विषबाधा झालेल्या १७५ मेंढ्यावर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव जाधव यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-कौतुकास्पद! तांड्यावरील सुनेची सीआरपीएफमध्ये निवड; गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत
पशुवैद्यक महाविद्यालय शवविच्छेदन
भारसवाडा येथे मृत्यू झालेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या मेंढ्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘चंद्रकांत खैरेंना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्यापासून कोणी रोखले आहे, माहीत नाही’
पथक तळ ठोकून
विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे भारसवाडा येते ४५ ते ५० मिनिटांचा मृत्यू झाला आहे. इतर मेंढ्यांना विषबाधा झाली आहे. या मेंढ्या वर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे आणि परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे पथक भारसवाडा येथे तळ ठोकून आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली मेंढ्या वर उपचार केले जात आहेत.