नवी दिल्ली: Samsung Upcoming Smartphone: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) ग्राहकांसाठी कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स सादर करत आहे. कंपनी ए-सीरिज आणि झेड-सीरिजमधील नवीन हँडसेट्सला लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय एक्स-सीरिज अंतर्गत एक रनर फोन देखील आणत आहे. वाय-फाय अॅलायन्स वेबसाइटवरून अपकमिंग फोनची माहिती समोर आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजमधील स्मार्टफोन एसएम-ए०४५एफ/डीएस कोडने लिस्टेड आहे. कंपनी आपला बजेट स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए०४एस ला लवकरच लाँच करणार आहे. या फोनला गीकबेंच डेटाबेसवर पाहण्यात आले आहे. येथूनच फोनच्या प्रोसेसर, रॅम आणि ओएस सारख्या महत्त्वपूर्ण फीचर्सचा खुलासा झाला आहे. आता वाय-फाय अॅलायन्स वेबसाइटवर नवीन गॅलेक्सी ए सीरिजला पाहण्यात आले आहे.

वाचा: ऑफर्सचा पाऊस! Amazon वर सुरू आहे खास सेल, अवघ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील अनेक उपयोगी वस्तू

वाय-फाय अॅलायन्स डेटाबेसने सॅमसंग गॅलेक्सी ए०४ फोनचा खुलासा केला आहे. नावासोबतच फोनचे ओएस व्हर्जन, मॉडेल नंबर आणि वाय-फायची माहिती दिली आहे. फोनच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर लीक रेंडर्सनुसार, वॉल्यूम बटन फोनच्या उजव्या बाजूला असेल व हे इंटिग्रेटेड पॉवर बटनसह येतील.

Samsung Galaxy A04 चे संभाव्य फीचर्स

डिव्हाइस ड्यूल बँड वाय-फाय (२.४GHz आणि ५GHz) सपोर्टसह येईल. वाय-फाय एसी/एन/ए/बी/जी कनेक्टिव्हिटीचा पर्याय मिळेल. मॉडेल नंबरनुसार फोन ड्यूल सिमसह येईल. या व्यतिरिक्त फोनबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. वाय-फाय अॅप्लायन्स वेबसाइटवर प्रोडक्टचे नाव गॅलेक्सी ए०४ असल्याचे समोर आले आहे. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी ए०३ चे सक्सेसर असेल. कंपनी फोनला सॅमसंग गॅलेक्सी ए०४ या नावाने लाँच करेल. सॅमसंगचा हा अपकमिंग स्मार्टफोन अँड्राइड १२ आधारित वन यूआय ३ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

वाचा: विवाहित महिला Google वर नक्की काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

दरम्यान, सॅमसंगने भारतात फेब्रुवारी २०२२ मध्ये गॅलेक्सी ए०३ स्मार्टफोनला लाँच केले होते. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच टीएफटी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. डिव्हाइसमध्ये यूनिसोक टी६०६ ऑक्टा-कोर प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. यात ४ जीबीपर्यंत रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोन ड्यूल-कॅमेरा सेटअपसह येतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला आहे. तसेच, सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

वाचा: WhatsApp Pay: व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सला देत आहे तब्बल १०५ रुपये कॅशबॅक, असा घेता येईल फायदाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.