कोलंबो : श्रीलंकेतील सीलोन इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे अध्यक्ष एम.सी.सी. फर्डिनेंडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याबाबत भारतात देखील चर्चा झाली होती. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांचा संदर्भ देत नरेंद्र मोदी यांनी अदानी ग्रुपला ५०० मेगावॅट क्षमतेचा पवनचक्की प्रकल्प देण्यासंदर्भात बाजू मांडली होती,असं फर्डिनेंडो म्हणाले होते. आता, फर्डिनेंडो यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन माघार घेत नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे.

नरेंद्र मोदींची बिनशर्त माफी
एम.सी.सी. फर्डिनेंडो यांनी नरेंद्र मोदी यांची एका वक्तव्यासाठी बिनशर्त माफी मागितली आहे. सीओपीईच्या बैठकीत भावूक झाल्यानं खोटं बोललो, असं ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील वक्तव्य माघारी घेत असल्याचं फर्डिनेंडो यांनी म्हटलं आहे.

गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज: एकनाथ खडसे

श्रीलंकेतील वीज प्राधिकरणाचे प्रमुख एम.सी.सी. फर्डिनेंडो यांनी एका संसदीय समितीसमोर साक्ष देताना राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी नरेंद्र मोदी यांनी अदानी ग्रुपला ५०० मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पासंदर्भात बाजू माडल्याचं सांगितल्याचा दावा केला होता. गोतबाया राजपक्षे यांनी हा दावा फेटाळून लावला होता. कोणत्याही संस्थेला योजनेचं काम देण्याबाबत फर्डिनेंडो यांनी केलेला दावा राजपक्षे यांनी फेटाळला आहे.

राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची नाराजी स्वाभाविकच: जयंत पाटील

सीईबी प्रमुख एम.सी.सी. फर्डिनेंडो यांनी सीओपीईचे प्रमुख चरिता हेराथ यांना नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील वक्तव्यासंदर्भात माफी मागत असल्याचं म्हटलं आहे. एका चर्चेदरम्यान भावुक झाल्यानं त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचं नाव घेतल्याचं म्हटलं. नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख चुकीचा असल्यानं ते वक्तव्य कामकाजातून हटवावं आणि बिनशर्त माफी मागत असल्याचं फर्डिनेंडो म्हणाले.

राष्ट्रपतींनी हात झटकले
१० जून रोजी सोओपीईच्या बैठकीत फर्डिनेंडो यांनी नरेंद्र मोदींनी अदानी ग्रुपला एक टेंडर मिळावं यासाठी जोर लावला होता, असं राष्ट्रपती गोतबाया राजपक्षेंनी सांगितल्याचं म्हटलं होतं. फर्डिनेंडोंच्या त्या वक्तव्याबाबत गोतबाया राजपक्षे यांनी हात झटकले आहेत. गोतबाया राजपक्षे यांनी काल ट्विट करुन या संदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.

धनंजय महाडिकांनी राजू शेट्टींचे रस्त्यातच पाय धरले! 92129794

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.