मुंबई : झी मराठीवर नवी मालिका सुरू होत आहे. नवा गडी, नवं राज्य. सुरुवातीला अभिनेत्री अनिता दातेच्या फोटोला हार घातलेला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. आता या मालिकेचे वेगवेगळे प्रोमो समोर येत आहेत. त्यावरून पहिली बायको रमा आता या जगात नाही. पण तिचं अस्तित्व लग्न करून आलेल्या दुसऱ्या बायकोला आनंदीला पदोपदी जाणवत राहतं.

आता एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात नुकतंच लग्न झालेली रमा उखाणा घ्यायला सुरुवात करते. ती म्हणते, ‘शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून’, ती पुढे उखाणा पूर्ण करणार इतक्यात तिथे रमा येते आणि म्हणते, ‘गाठ आहे माझ्याशी, आनंदी जरा जपून.’ रमाच्या भूमिकेत अनिता दाते आणि आनंदीच्या भूमिकेत पल्लवी पाटील आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.

कलेक्टर अप्पी येतेय, छोट्या पडद्यावर सुरू होतेय नवी संघर्ष कथा

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे अनिताची राधिका घराघरात पोहोचली. आजही लोकांना ती आठवतेय. आता इथे रमाच्या भूमिकेत अनिताला पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. शिवाय ही रमा निवर्तली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचं काही पाहायला मिळेल, असं प्रेक्षकांना वाटत आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटील हिने मराठी सिनेमात बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. क्लासमेट्स, सविता दामोदर परांजपे, बाॅइज २, ट्रिपल सीट, तू तिथे असावे अशा सिनेमांमध्ये पल्लवीनं महत्त्वाच्या भूमिका केल्या. पल्लवीनं जिगरबाज या मालिकेत डाॅ. सुहानी गायकवाडची व्यक्तिरेखा उभी केली होती. आता पल्लवी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहे.

Video : मंगळगौरीच्या पूजेला अरुंधती घेते उखाणा, तेव्हाच आशुतोष नितीनवर का चिडला?

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली, ‘मराठी चित्रपटात खूप शिकायला मिळालं आणि आता मला एक नवीन संधी मिळाली आहे, या मालिकेत काम करण्याची. आनंदी हे पात्र रमाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते आणि सगळी आव्हानं स्वीकारते. आनंदीचं पात्र निभावताना मला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांना पण आनंदीच पात्र आवडेल अशी अपेक्षा करते.’

सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत, सेलिब्रिटी महिलांचा उलगडणार प्रवासSource link

Leave a Reply

Your email address will not be published.