मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त राजकीय विधान करते, राजकीय नेत्यांवर काही पोस्ट शेअर करते आणि तिच्याभोवती वादळ उठतं. अभिनेता किरण माने जेव्हा राजकीय मत मांडतो तेव्हा त्याला मालिकेतून काढलं जातं. शरद पोंक्षे हे राजकारणावर बोलतात तेव्हा त्यांना अनेकांना उत्तरं द्यावी लागतात. कलाकार आणि त्यांच्या राजकीय अभिव्यक्तीवरून नेहमीच वादंग उठत असतानाही अभिनेत्री सायली संजीव चं यावर एक खास म्हणणं आहे. ‘मला राजकारणाचा समाचार घ्यायचा आहे. ते माझं स्वप्नं आहे, कधीतरी मी हे स्वप्नं पूर्ण करेन.’ सायलीच्या या विधानाचा नेमका अर्थ आहे तरी काय?

सलमान खान वापरतोय बुलेटप्रूफ कार, हत्येच्या धमकीनंतर वाढवली अशी सुरक्षा

गोष्ट एका पैठणीची सिनेमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या निमित्ताने सायली सध्या अभिनंदनाच्या वर्षावात आहे. सायलीने या सिनेमात पैठणी घेण्यासाठीचा एका गृहिणीचा प्रवास मांडला आहे. मालिका, वेब सीरिज, सिनेमा या माध्यमांत रमलेल्या सायलीने कधीकाळी राजकीय विश्लेषक होण्याचं ध्येय बाळगलं होतं. अजूनही हा विचार तिच्या मनात आहे. ‘अभिनेत्री नसते तर राजकीय विश्लेषक असते,’ असं म्हणत सायलीने ही गोष्ट शेअर केली. तिला कॉलेजमध्ये असतानाच राजकारणाच्या अभ्यासाची गोडी लागली आणि राज्यशास्त्र विषयात तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं.


अभिनेत्री सायली संजीवला राजकीय विश्लेषक म्हणून करिअर करायचं होतं. तिने फक्त हे स्वप्न बघितलच नाहीतर राज्यशास्त्र विषयामध्ये तिने पदवीही संपादन केली. पण अभिनय करण्याची एक संधी मिळाली आणि तिच्यासाठी या क्षेत्रात येण्याचं दार खुलं झालं. अजूनही तिला राजकारणाकडे पाहत असताना राजकारणाविषयी केवळ पोकळ बोलण्यापेक्षा त्यावर काहीतरी खरमरीत लिहावं असं नेहमी वाटत असतं हेच तिच्यामध्ये कुठेतरी जिवंत असलेल्या राजकीय विश्लेषकाचे लक्षण आहे.

ज्या घरात राहत होता नागा चैतन्य, सामंथाने तेच घर घेतलं विकत

काहे दिया परदेस या मालिकेतून गौरीची भूमिका करत घराघरात पोहोचली. शुभमंगल ऑनलाइन मालिका, झिम्मा सिनेमा यातूनही ती प्रेक्षकांना भेटली. सायली संजीव अभिनय क्षेत्रात आली नसती तर नक्कीच आज एखाद्या वृत्तपत्र किंवा न्यूज चॅनेल मध्ये राजकारणातील घडामोडींचा खरपूस समाचार घेत असताना दिसली असती.


पदवीसाठी तिने निवडलेला प्रोजेक्ट राजकारणातील विश्लेषणावर आधारित होता. सायली एका मुलाखतीत बोलताना म्हणाली की खरेतर राजकारण हे सर्वसामान्य लोकांना आवडत नाही हे पण खरंच आहे पण एक राजकीय विश्लेषक म्हणून करिअर करणं ही सोपी गोष्ट नाही. आज आपण जे राजकीय विश्लेषक पाहतो त्यांना या राजकारणावर खूप अभ्यास करावा लागतो. राजकारणात घडणारी एखादी गोष्ट किंवा एखादी घडामोडही सगळ्याबाजूने तपासून बघत मग त्यावर विश्लेषण करावे लागतं. त्यामुळे राजकीय विश्लेषक हे क्षेत्र मला खूप आव्हानात्मक वाटतं.


ती पुढे म्हणाली की, ‘राजकारणाविषयी असलेला हाच दृष्टिकोन मला कॉलेज जीवनामध्ये राजकीय विश्लेषक होण्याचं स्वप्न दाखवून गेला. पण दरम्यानच्या काळात माझ्या आयुष्यात अभिनयाच्या अशा काही संधी उपलब्ध झाल्या की त्यामुळे माझ्या मनातलं हे स्वप्न थोडंसं मागे पडलं. भविष्यात मला कधी राजकारणावर लिहायची वेळ आली तर मी नक्कीच त्यासाठी स्वतःला सज्ज ठेवेन.’ त्यामुळेच मनोरंजन क्षेत्रामध्ये घोडदौड करत असलेली सायली भविष्यात कधीतरी राजकीय विश्लेषक म्हणून लिहिती झाली तर नक्कीच आश्चर्य वाटायला नको.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.