कोट्यवधींची संपत्ती असलेल्या अंबानी कुटुंबाचा कोणताही समारंभ साधा होईल असा विचार करणं देखील चुकीचे आहे. या गोष्टीची झलक अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल याच्या लग्नात पाहायला मिळाली.

अनमोल-क्रिशाच्या लग्नात प्रत्येकजण इतका सुंदर दिसत होता की त्यांच्यापासून नजर हटवता येत नव्हती. विशेषत: तिच्या नातवाच्या लग्नात आजी कोकिलाबेन अंबानी यांचा लूक असा होता, ज्यांच्या वरुन नदर हटवता येत नव्हती. यावेळी कोकिलाबेन यांनी कलमकारी प्रिंट असलेली साडी परिधान केली होती. या साडीच्या बारीक नक्षीवरु आणि तिच्या रंगावरुन कोणाचेच लक्ष हटत नव्हते.
(फोटो सौजन्य -@_ishaambanipiramal)

​कोकिलाबेन अंबानी यांची साडी

यावेळी कोकिलाबेन अंबानी यांनी नातवाच्या लग्नाच्या खूप चांगल्या तयार झाल्या होत्या. हळदी सारख्या कार्यक्रमामध्ये वास्तविक पाहता पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. पण कोकिलाबेन अंबानी यांनी स्वतःसाठी गुलाबी रेशमी रंगाची साडी निवडली होती. प्रत्येक कार्यक्रमात कोकिलाबेन आपल्याल साडीमध्ये पाहायला मिळतात. यावेळी देखील कोकिलाबेन यांनी सुंदर अशी कलमकारी साडी परिधान केली होती.

(वाचा :- डिपनेक मल्टी कलर ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून चाहत्यांचेही मनं हरवले, फोटो प्रचंड व्हायरल)

​साडीचे नक्षी

या फुलांच्या आणि वेलींच्या नक्षी देण्यात आल्या होत्या. या नक्षीला सोनेरी कडा देण्यात आली होती. त्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसत होती. घरातील एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही देखील अशी साडी परिधान करु शकता.

(वाचा :- ब्लॅक डीपनेक ड्रेसआणि शॉर्ट हेअरमध्ये दिशा पटानीचा जलवा, तिच्या बोल्डनेसने सर्वांना केलं क्लिन बोल्ड)

​मॅचिंग ब्लाउज

कोकिलाबेन अंबानी यांनी या साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज घातला होता. या ब्लाऊजला सोनेरी काठ देण्यात आला होता. साधारण गुजरात प्रांतात या प्रकारच्या साड्या मोठ्या प्रमाणत घातल्या जातात. हातमागावर बनवलेल्या या साड्या दिसायला देखील एलिगन्ट वाटतात. या साड्यामुळे तुम्हाला रिच लूक मिळू शकतो.

(वाचा :- Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे पेपर प्रिंन्ट साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल, ‘माळी टाईम्स’ म्हणत फोटो केले शेअर)

​कोकिलाबेनचे दागिने

या सुंदर साडीवर कोकिलाबेन यांनी मॅचिंग अशी लाल रंगाची गळ्यात माळ घातली होती आणि तिच्या कानाभोवती माणिक जडलेले स्टड घातले होते. त्याचवेळी तिने एका हातात बांगड्या आणि दुसर्‍या हातात ब्रेसलेट घातले होते. या साध्या लूकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या.

(वाचा :- Mouni roy bold photos : लग्नानंतर पहिल्यांदाच मौनी रॉयने शेअर केले बेडवरील टॉपलेस फोटोज, बिकिनीतील बोल्ड फोटोज प्रचंड व्हायरल)

​कृशा शाहचा कुर्ता सेट

कृशा शाहबद्दल सांगायचे तर, यावेळी तिने गुलाबी रंगाचा भारी भरतकाम केलेला कुर्ता-सेट परिधान केला होता. या कुर्तीवर पांढऱ्या रंगाच्या रेशमी धाग्यांनी हाताने भरतकाम केले होते, ज्यासोबत तिने टाय-डाय दुपट्टा जोडला होता. हा पोशाख नाजूक लूकमध्ये होता, जो हळदी समारंभात वधूला पूर्णपणे वेगळा लुक देत होता.

(वाचा :- Isha Ambani : कुंदन मोत्यांचा हार, आणि लेहंग्यामध्ये ईशा अंबानीचा हटके अंदाज, नववधू पेक्षा ही दिसली सुंदर )Source link

Leave a Reply

Your email address will not be published.