नाशिक : विनापरवाना वृक्ष तोडल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेने खासदारपुत्र अजिंक्य गोडसे व योगेश ताजनपुरे यांना तब्बल ४ लाख २० हजारांचा दंड ठोठावला आहे. नाशिकरोड पोलिसांच्या मदतीने पालिकेने तोडलेल्या लाकडांचा एक टेम्पो जप्त केला आहे. खासदार पुत्रानेच वृक्षतोड करत कायद्याचे उल्लंघन केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. Nashik Municipal Corporation fines Ajinkya Godse and Yogesh Tajanpure Rs 4 lakh for cutting down unlicensed trees

सात दिवसांच्या आत दंड न भरल्यास महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियम १९७५ चे कलम ८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने काढलेल्या नोटिशीतून दिला आहे. नाशिक महापालिकेचे उपायुक्त दिलीप मेनकर हे सिन्नर फाटा परिसरात गुरुवारी (दि.९) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास स्वच्छतेची पाहणी करत होते. यावेळी त्यांना जुना ओढा रोड, खर्जुल मळा उड्डानणपुलाच्या जागेतील सर्वे १९३/२० येथे झाडे तोडून ती टॅम्पो या वाहनात टाकलेली दिसली. वृक्ष तोडण्यासाठी परवानगी घेतली आहे का, याची विचारणा उपायुक्त मेनकर यांनी त्या वाहनधारकाकडे केली.

क्लिक करा आणि वाचा- एकाच वेळी सर्वत्र रुग्णवाढ नाही, करोननाबाबत तज्ज्ञांचे दिलासादायक भाकीत

त्या वाहनधारकाने काही माहिती नसल्याचे सांगितले. पुढे ही झाडे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे सुपुत्र अजिक्य हेमंत गोडसे, योगेश ताजनपूरे यांच्या सांगण्यावरुन अवैधरित्या वृक्ष तोडल्याचे समजले. यानंतर पालिकेने या दोन्हींच्या नावाने नोटीस काढत ४ लाख २० हजारांचा दंड ठोठावला. प्रारंभी ही नोटीस घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर पालिके चे नाशिकरोडचे उद्यान निरीक्षक एजाज शेख, पठाडे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी पत्र दिले. तसेच संबंधितांनी दंड भरला नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोनाची धास्ती, जिल्ह्यात १९ बाधित; ३२५ अहवाल प्रलंबित

नुकताच ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात पार पडला. यावेळी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षरोपण महत्वाचे असल्याचे सांगत अनेक संस्थांनी वृक्षरोपण केले. मात्र दुसरीकडे नाशकात अशा प्रकारे थेट अवैध वृक्षतोड केल्याचा प्रकार घडला आहे.

क्लिक करा ाणि वाचा- शेतकऱ्यांनी ५८ लाख सरकारला केले परत, कारवाईला सुरुवात

हे वृक्ष तोडले

रेनट्री १ वृक्ष (१ लाख)
काशिद १ वृक्ष (६० हजार)
काटेरी बाभूळ् १ (१ लाख)
काटेरी बाभूळ् १ (४० हजार)
काटेरी बाभूळ् १ (४० हजार)
काटेरी बाभूळ १ (४५ हजार)
काटेरी बाभूळ १ (३५ हजार)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.