नवी दिल्ली: भाजप नेता नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मोठा राडा सुरू झाला आहे. या वक्तव्याचे पडसाद भारतापासून जगभरात उमटत आहेत. या वादानंतर नुपूर शर्माविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. अशात काहींनी तिला पाठिंबा देखील दिला आहे. या गंभीर विषयावर भारताच्या माजी क्रिकेटपटूने उडी मारली आहे. सोशल मीडियावर फार सक्रिय नसणार आणि कोणत्याही वादात उडी न घेणाऱ्या वेंकटेश प्रसाद (venkatesh prasad)ने नुपूरला पाठिंबा दिलाय.

बेळगावात एका मशिदीबाहेर नुपूरच्या पुतळ्याला फाशी देण्याच्या घटनेवर प्रसादने प्रतिक्रिया दिली आहे. मला विश्वास बसत नाहीय की हा २१व्या शतकातील भारत आहे, असे म्हणत प्रसादने एका पाठोपाठ एक ट्विट केले आहेत. यावर काही लोकांनी प्रसादला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रसादने देखील सडेतोड उत्तर दिले. प्रसाद शिवाय भाजप नेता आणि माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील ट्वीट करून नुपूरला पाठिंबा दिलाय.

वाचा- नुपूर शर्माच्या पुतळ्याला फाशी; भारताचा क्रिकेटपटू भडकला, पाहा काय म्हणाला…

प्रसादने याआधीही सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. तेव्हा तर त्याने थेट पाकिस्तानच्या चाहत्यांची बोलती बंद केली होती. जाणून घ्या काय झाले होते.

प्रसादने ११ एप्रिल २०२१ मध्ये एक फोटो ट्विट केला होता. हा फोटो १९९६च्या वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये अमिर सोहेलची बोल्ड घेतल्याचा होता. त्यावर पाकिस्तानच्या एका चाहत्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पाक चाहता प्रसादला म्हणाला, तुझ्या करिअरमधील ही एकमेव कमावलेली गोष्ट आहे.

वाचा- दक्षिण आफ्रिका एकटा संघ टीम इंडियाला पुरून उरला, आकडे जाणून बसेल धक्का

प्रसाद म्हणाला, नही नजीब भाई. करिअरमधील कमावलेली गोष्टी मी थोडी शिल्लक ठेवली होती. त्यानंतरच्या वर्ल्डकपमध्ये १९९९ साली इंग्लंडमध्ये मी पाकिस्तानविरुद्ध २७ धावा देत ५ विकेट घेतल्या आणि तेव्हा पाकला २२८ धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. देवाचे आशीर्वाद तुझ्या सोबत असोत. १९९९च्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारताने पाकचा पराभव केला होता. तेव्हा २२८ धावा करणाऱ्या भारताने पाकचा १८० धावांवर ऑल आउट केला होता.

वाचा- असं कुठवर चालणार; रोहित शर्मा नसेल तर तुम्ही जिंकणार नाही का?

काय झाले होते त्या सामन्यात… (1996 World Cup, India vs Pakistan)

भारताने प्रथम फलंदाजी करत ८ बाद २८७ धावा केल्या होत्या. नवजोत सिंह सिद्धूने ९३ तर जडेजाने ४५ धावांचे योगदान दिले होते. या सामन्यात वसीम अकरम दुखापतीमुळे संघाबाहेर होता आणि सोहेलकडे नेतृत्व देण्यात आले होते. पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली होती. सोहेल आणि सईद अन्वर यांनी ११ षटकात ८४ धावा केल्या. अन्वर बाद झाल्यानंतर सोहेल मोठे फटके खेळत होता. त्याने प्रसादच्या चेंडूवर एक चौकार मारला आणि इशारा करून पुढील चेंडूवर तेथेच चौकार मारणार असा इशारा केला. त्यानंतरच्या चेंडूवर प्रसादने त्याची बोल्ड घेतली. प्रसादने बोल्ड घेतल्यानंतर ज्या पद्धतीने सोहेलला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले ती घटना भारतीय चाहते कधीच विसरू शकणार नाहीत.

वाचा- करायचा होता तर एखादा चांगला रेकॉर्ड करायचा; ऋषभ पंतने पाहा काय केलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.