बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. नोराच्या प्रयत्न लूक सोशल मीडियावर अगदी आग लावत असतो. अभिनेत्री नोरा फतेही तिच्या मादक आदांनी सर्वांना नेहमीच घायाळ करत असते.

पारंपारिक कपडे असोत किंवा वेस्टन वेअर ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच नोराने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नोराने गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. नोराची ही साडी पाहून तुमची नजर नोरावरुन हटणार सुद्धा नाही.
(फोटो सौजन्य : Instagram @norafatehi )

​डिझायनर साडीत नोराचा लूक

नोरा फतेहीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती सोनेरी काठ असलेल्या साडीत दिसत आहे. या साडीतीने काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही सुंदर साडी नोराने बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कलेक्शनमधून निवडली होती. या पारदर्शक साडीवर सफेद आणि गोल्डन रंगाची बारीक नक्षी करण्यात आली होती. या साडीमध्ये नोरा प्रचंड सुंदर दिसत होती.

(वाचा :- Isha Ambani : कुंदन मोत्यांचा हार, आणि लेहंग्यामध्ये ईशा अंबानीचा हटके अंदाज, नववधू पेक्षा ही दिसली सुंदर )

​स्लीव्हलेस ब्लाउजचा नुर

या सुंदर साडीवर नोराने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. या ब्लाउजला गोल्डन काठ देण्यात आला होता. त्यामुळे ही साडी फार सुंदर वाटत होती. साडीचा संपूर्ण लूक ब्लाऊजवर अवलंबून असतो. जर तुम्ही चांगले ब्लाऊज घातलेत तर तुमचा लूक फार सुंदर दिसू शकतो. त्यामुळे ब्लाऊज निवडताना नक्की काळजी घ्या.

(वाचा :- Alia Bhatt : प्रेग्नेंट आलिया भट्टचे ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून नणंदबाईंना सुद्धा कमेंट्स करायचा मोह आवरला नाही)

​साडीवरील बारीक काम

नोराची ही सी-थ्रू फॅब्रिक साडी खूपच सुंदर दिसत आहे.या साडीवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती, ज्यामध्ये पांढरी फुले दिसत होती.यावर सुंदर असा सोनेरी कडा देण्यात आली आहे.

(वाचा :- कशाला हवे डीप व बोल्ड ड्रेस, ब्लॅक ट्रान्सपरंट साडी व बोल्ड ब्लाउजमध्ये जान्हवी कपूरचा राडा, फिगरवर लाखो घायाळ)

ज्वेलरी

नोराने तिची लूक पूर्ण करण्यासाठी स्टेटमेंट ज्वेलरी घेतली होती. तिने कानात मोत्याचे झुमके, मॅचिंग बांगड्या आणि सोन्याची स्टेटमेंट अंगठी घातली होती. तुम्ही देखील जर असा लूक केलात तर त्यावर तुम्ही देखील अशी ज्वेलरी परिधान करु शकता. फार काही न करता तुम्हाला ग्लॅमरस लूक मिळू शकता.

(वाचा :- टाइट मिनी स्कर्ट व ब्रालेट टॉप, मलायकाचा बोल्ड लुक व्हायरल, बॉयफ्रेंडसोबत रोमांस बघून फॅन्सच्या मनात फुटले लाडू)

​मेकअप

या सुंदर लूकसाठी नोराने डोळ्यांनी गोल्डन आयशॉडो लावला आहे. तर पिंक रंगाची लिपस्टिक तिने लावली आहे. तसेच मस्करा आणि गाल ग्लॅसी ठेवण्यात आले आहेत. आता येणाऱ्या फेस्टिव्हलसाठी तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- Ananya Pande : येल्लो ड्रेसमध्ये अनन्याने केल्या बेल्डनेसच्या सर्व लिमिट्स पार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

​हेअरस्टाईल

या लूकसाठी नोराने तिचे केस व्हेवी ठेवले आहेत. मोकळ्या केसांमध्ये नोराने सर्वांचे मन जिंकले आहे. जर तुम्ही साडी परिधान करणार असाल तर तुम्ही देखील असा लूक करु शकता.

(वाचा :- शिमरी साडीत जेनेलिया डिसूजाचा लूक पाहून भानच हसवून बसाल, ब्लाऊजची डिझाइन पाहून तर चक्रावून जाल)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.