मुंबई: आज पालक बनणं सोपं राहिलेलं नाही. सर्वसामान्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटी कलाकारांनाही त्यांच्या मुलांना वाढवत असताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. बॉलिवूडमधील कलाकारांनाही याचा अनुभव येत असतो. अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील एक यशस्वी कपल म्हणून ओळखलं जातं तसच ते पालक म्हणून कसे आहेत याचीही त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी अजय आणि काजोल नेहमीच प्राधान्य देतात हे त्यांच्या फोटो आणि व्हिडिओमधून दिसतं. १९ जून रोजी साजरा होत असलेल्या फादर्स डेच्यानिमित्ताने अजय देवगणने त्याच्या पालकत्वाचे काही अनुभव शेअर केले आहेत. जेव्हा त्याची मुलं न्यासा आणि युग ऐकत नाहीत, चुका करतात तेव्हा अजय देवगण बाबा म्हणून कसा वागतो हे अजयनं सांगितलं आहे.

अजय आणि काजोल यांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत. न्यास १९ वर्षाची आहे तर युग १३ वर्षांचा आहे. न्यासा सध्या परदेशात शिक्षण घेत असून युग मुंबईतच आहे. सिनेमाक्षेत्रात काम करणारा अजय कितीही बिझी असला तरी तो मुलांसाठी वेळ काढतोच. स्टारकिडस असली तरी ती मुलंच असतात. हट्ट करणे, चुकीचं वागणे या गोष्टी कलाकारांच्या मुलांकडूनही होत असतात. मग अशा चुका जेव्हा अजय देवगणची मुलं करतात तेव्हा तो ती परिस्थिती कशी हाताळतो हे ऐकणं खूपच रंजक आहे. अजयने त्याच्या अनुभवातून आजच्या पालकांनी कसं वागलं पाहिजे हेही सांगितलं.

सतत मुलांना रागवणे, त्यांना शिस्त लावण्यासाठी कडक वागणं हे अजयला पटत नाही. अजय म्हणतो, जर मुलांना चांगलं वाढवायचं असेल, त्यांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचे मित्र बनलं पाहिजे. मित्र बनून त्यांना मार्गदर्शन करणं ही आजच्या पालकत्वाची गरज आहे. मी माझ्या मुलांशी असंच वागतो. सध्या पालकत्व ही सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. मुलांना सुरक्षितता, शिक्षण, करिअर मार्गदर्शन देणं हे कर्तव्य आहेच पण मुलांच्या बाबतीत स्ट्रीक्ट राहून चालत नाही, नाहीतर मुलं आणि आपल्यात अंतर येतं.

सध्या सोशल मीडियाचा खूप प्रभाव आहे. गेल्या काही दिवसात अजयची मुलगी न्यासा हिचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आहेत. अजय आणि काजोलसोबत मुलगा युगही स्पॉट केला जातो. स्टारकिडस म्हणून अजय याकडे कसं बघतो असंही अजयला मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर अजयने अगदी सहज उत्तर दिलं., तो म्हणाला, सोशलमीडिया ही आजची गरज आहे. मग माझी मुलंही त्यापासून अलिप्त कशी राहतील? सध्या तर आम्ही कलाकार जितके ट्रोल होत नाही तितकी आमची मुलं ट्रोल होतात. पण याविषयीही माझा मुलांशी मैत्रीपूर्णच संवाद असतो.

अजय जरी त्याच्या मुलांशी मित्र म्हणून वागत असला तरी अजयचे वडील वीरू देवगण हे मात्र खूप कडक होते. काजोलचं संगोपनही काहीसं कडक वातावरणात झालं आहे. यावर अजय सांगतो, आमचे पालक कडकशिस्तीचे होते कारण तेव्हा पालकत्वाची तीच पध्दत होती. आता मात्र बदल होणं आवश्यक आहे. मी तो बदल केला आहे. आमचे पालक का कडक वागायचे याचं कारण मला मोठेपणी कळलं. मी माझ्या मुलांना एकच गोष्ट सांगतो, की कितीही प्रसिध्द मिळाली तरी जमिनीपासून पाय हलू देऊ नका आणि त्यांनी कायम अSource link

Leave a Reply

Your email address will not be published.