दीपिका पादुकोण (Deepika padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलीवूडमधील मोस्ट लव्हेबल कपल आहे आणि एवढेच नव्हते तर हे कपल चाहत्यांचे सुद्धा सर्वात जास्त आवडते कपल आहे. दोघांमधली केमिस्ट्री आणि एकमेकांवर असलेले जीवापाड प्रेम त्यांचे नाते अनोखे ठरवते. जेव्हा कधी दोघे एकसाथ स्पॉट होतात तेव्हा त्यांच्यातील प्रेम पाहून आपसूकच चेहऱ्यावर दोघे किती क्युट आहेत आणि प्रेम असावं तर असं असे भाव आल्याशिवाय राहत नाहीत. दोघांची केमिस्ट्री इतकी भन्नाट आहे की ते स्वत:कडे सर्वांचे लक्ष खेचून घेतातच!

याशिवाय पब्लीकली आपले प्रेम दाखवणे असो किंवा एकमेकांची सपोर्ट सिस्टम बनून ट्रोलर्सना जबरदस्त उत्तर देणे असो दोघे जे काही करतात ते एकत्र एकमेकांसोबत राहूनच करतात. यामुळेच की काय बॉलीवूड मधील इतर कपल्ससुद्धा त्यांच्या समोर फिके पडतात. असेच काहीसे नुकतेच पाहायला मिळाले जेव्हा दोघेही एकत्र रॅम्पवर उतरले आणि दोघांनीही जमलेल्या लोकांकडून वाहवा मिळवली. (सर्व फोटोज – योगेन शाह)

मनीष मल्होत्राचा इव्हेंट

भारतातील सुप्रसिद्ध फॅशन डिजाईनर मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra) इव्हेंटमध्ये ही गोष्ट घडली. मनीष मल्होत्रा यांनी आपले लेटेस्ट कलेक्शन म्हणजेच मिजवान कलेक्शन 2022 सदर करण्यासाठी हा इव्हेंट आयोजित केला होता आणि या इव्हेंटसाठी दीपका आणि रणवीर या दोन लव्हबर्डसने सुद्धा हजेरी लावली होती. दोघेही जेव्हा रॅम्पवर अवतरले तेव्हा जमलेल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा जाणून एनर्जी अवतरली आणि जोवर दोघे रॅम्पवर होते तोवर इव्हेंटमध्ये चार चांद लागले.

(वाचा :- छोटासा टॉप व शॉर्ट पॅंटमध्ये प्रियांका चोप्राने माजवला सोशल मीडियावर कहर, मालती मेरीच्या आईची फिगर बघून चाहत्यांना चक्कर)

दीपकाने परिधान केला होता जडाऊ लेहंगा

सर्वात आधी आपण जाणून घेऊया दीपिका पादुकोणच्या लुकबद्दल, तर मंडळी या इव्हेंटमध्ये दीपकाने डिजाईनर कलेक्शनमधून एक सुंदर लेहंगा पिक केला होता, जो तिला साहजिकच अगदी खुलून दिसत होता. जणू हा लेहंगा तिच्यासाठीच बनवला आहे की काय असे वाटत होते. या ट्रेडिशनल इंडियन आउटफिटमध्ये दीपिकाचे केवळ सौंदर्यच बहरून आले नव्हते तर जेव्हा ती अगदी जबरदस्त ग्रेससह रॅम्पवर उतरली तेव्हा जणू स्वर्गातील अप्सरा धरतीवर अवतरल्याचाच भास सर्वांना झाला.

(वाचा :- आजवरील सर्वात बोल्ड व सेक्सी ब्लॅक ट्रान्सपरंट ब्रालेट घालून मलायका अरोराचा रॅम्प वॉक, चाहत्यांना फुटला दरदरून घाम)

डिटेलिंग होती जबरदस्त

जेव्हा दीपिका रॅम्पवर उतरली आणि तेव्हा सर्वांच्याच नजरा दंग झाल्या. रॅम्पवर आलेल्या दीपकाने जो लेहंगा परिधान केला होरा त्याचा पॅटर्न चंदेरी रंगाचा जडाऊ लुकमध्ये होता. ज्यावर चांदीच्या तारांनी हातांनी बारीक काम केलेलं स्पष्टपणे दिसत होते. लेहंग्याच्या स्कर्टला ए-लाईन लुक दिला होता, ज्यासोबत क्रॉप असणारी सेक्सी चोळी ग्लॅमर कोशंटला हायलाईट करत होती. एकंदर तिचा हा लेहंगा लुक अगदी किलर ठरला.

(वाचा :- ब्लॅक ट्रान्सपरंट बिकिनी व डीपनेक ड्रेस घालून अमिषा पटेलने लावली इंटरनेटवर आग, बोल्ड फोटो बघून चाहत्यांची बत्ती गुल)

रणवीरच्या लुकची तर हवाच..

नुकतेच न्यूड फोटोशूटमुळे ब्रेकिंगमध्येच नाही तर प्रचंड ट्रोल झालेला रणवीर इथे मात्र अगदीच निराळ्या अंदाजात दिसला. या इव्हेंटसाठी रणवीरने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि त्याचा हा लुक खरंच खूप हँडसम होता. रणवीरने डिजाईनर कलेक्शनमधूनच काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा पिक केला होता आणि तोच त्याने परिधान केला होता. या सोबतच लुक अधिक जास्त शाही वाटावा म्हणून त्याने एम्ब्रॉइडरी असणारं जॅकेट सुद्धा परिधान केलं होतं.

(वाचा :- दिशा पाटणीने शेअर केले बेडरूममधील बोल्ड फोटोज, सेक्सी मिनी स्कर्ट व क्रॉप टॉपमधील लुक बघून चाहत्यांना फुटला घाम)

आईच्या पाया पडला

रणवीर सिंहचा लुक तर खूप जास्त किलर होता यात कोणतीच शंका नाही पण तुम्हाला माहित आहे का त्याच्या या लुकपेक्षा लोक जास्त इम्प्रेस झाले त्याने केलेल्या एका कृतीमुळे! ती कृती काय होती विचारताय? चला तेच जाणून घेऊया. रणवीर रॅम्पवर आला आणि त्याने वॉक केले. तेवढ्यात त्याची नजर ऑडीयन्समध्ये बसलेल्या आईवर गेली आणि लागलीच त्याने तिच्या जवळ जाऊन तो तिच्या पाया पडला. त्याची ही कृती पाहून उपस्थिती प्रत्येकजण भारावला. आयुष्यात कितीही मोठा झाला तरी तो आपल्याला आईला विसरलेला नाही आणि त्याचे हेच मातृप्रेम या इव्हेंटमधला युएसपी ठरले.

(वाचा :- 40वा बर्थडे प्रियंका चोप्राचा पण बोल्डनेसचा कहर केला परिणीती चोप्राने, जीजू निकसोबतचा ‘तो’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल)

रणवीर-दीपिकाचा रॅंपवॉक दरम्याम रोमांस..!

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.