हे वाचा-बॉयफ्रेंडसोबत बोल्ड फोटोशूट ते बीच वेडिंग! ‘शनाया’ देतेय कपल गोल्स
या सीरिजबाबत आणखी एक महत्त्वाची बाबत म्हणजे यामध्ये काही मराठी कलाकारही दिसणार आहे. यामध्ये सर्वप्रथम नाव घेता येईल ते ‘चंद्रमुखी’ फेम आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) याचे. आदिनाथची झलक या सीरिजच्या प्रोमोमध्ये जरी दिसत नसली तरी त्याची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आदिनाथने त्याच्या सोशल मीडियावर देखील हा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे.
हा टीझर शेअर करताना सीरिजच्या टीमने त्यातील प्रत्येक कलाकाराचे नाव नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आदिनाथ कोठारे याच्यासह आणखी दोन मराठी नावं या सीरिजमध्ये असल्याचे समजते आहे. क्रिमिनल जस्टिसच्या पुढील सीझनमध्ये उपेंद्र लिमये आणि कल्याणी मुळे हे कलाकार दिसणार आहेत. कल्याणी क्रिमिनल जस्टिसच्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसल्या होत्या.
हे वाचा-विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचं झालं ब्रेकअप? २ वर्षांपूर्वीच आलाय दुरावा!
या टीझरमध्ये माधव मिश्रा या वकिलाचा अर्थात पंकज यांचा एक डायलॉग आहे की, ‘विजय तुमचा किंवा माझा नव्हे तर न्यायाचा व्हायला हवा’. तर टीझरमध्ये असेही म्हटले आहे की माधव मिश्राच्या आयुष्यातील ही सर्वात कठीण केस असणार आहे. आता ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
मराठी कलाकारांचा बोलबाला केवळ याच सीरिजमध्ये नाही तर हिंदीतील इतरही बड्या प्रोजेक्ट्समध्ये मराठी कलाकार दिसणार आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये अभिनेत्री क्षिती जोग. तर आलियाच्या ‘डार्लिंग्ज’मध्ये संतोष जुवेकर, अजित केळकर आणि किरण करमरकर हे कलाकार दिसणार आहेत.