मुंबई: दिग्गज तेलुगू अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदमुरी तारक रामा राव (एनटी रामा राव) यांच्या मुलीचा मृत्यू (Sr. NTR Daughter Death) झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या मुलीचं नाव उमा माहेश्वरी (Uma Maheshwari Death) असून पोलिसांनी याची पुष्टी केली आहे की ही घटना सोमवारी ०१ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे वय ५७ होते.

पोलिसांकडून सुरुये तपासउमा माहेश्वरी काही आरोग्यासंबंधीत अडचणींचा सामना करत होत्या, त्यामुळे त्यांनी कथित स्वरुपात आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे ठोस कारण समजू शकले नसले तरी प्रकृतीशी संबंधित अडचणींमुळे हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांच्या आत्महत्येमागे त्याची वैद्यकीय स्थिती असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हे वाचा-सलमान खानला मिळालं बंदूक लायसन्स, गाडीपण केली बुलेटप्रूफ

माहेश्वरी यांच्या मुलीने सांगितली कहाणी

उमा माहेश्वरी यांना एक दीक्षिता नावाची मुलगी आहे. दीक्षिताच्या मते तिची आई साधारण दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिच्या खोलीत गेली आणि खूप वेळ ती बाहेरच आली नाही. दुपारी जवळपास अडीच वाजता दीक्षिताने पोलिसांनी याविषयी कळवले आणि पोलिसांनी तातडीने फॉरेन ज्युबली याठिकाणी असणारे त्यांचे निवासस्थान गाठले. त्यावेळी सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत उमा आढळून आल्या होत्या. अशी माहिती मिळते आहे की ही घटना घडली तेव्हा घरामध्ये चार जण उपस्थित होते.

हे वाचा-राजीव गांधींच्या हत्येतील दोषीबरोबर ‘बाहुबली’ फेम अभिनेत्याचा डान्स

कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, १९७३ च्या कलम १७४ अंतर्गत ज्युबली हिल्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दु:खद बातमी कळताच उमा माहेश्वरी यांच्या घरी एन. चंद्राबाबू नायडू, नंदमुरी कल्याण राम पोहोचले होते. एनटी रामाराव यांच्या १२ मुलांपैकी उमा सर्वात लहान होती. ८ भाऊ आणि ४ मुली अशी ही भावंड, त्यापैकी उमा सर्वात धाकट्या. नुकतेच उमा यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच संपूर्ण कुटुंबीय उमा यांच्या घरी जमले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.