नवी दिल्ली: भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७ विकेटनी पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे होते. पंतच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेलाय. भारताने प्रथम फलंदाजी करत ४ बाद २११ धावा केल्या होत्या. द.आफ्रिकेने विजयाचे लक्ष्य १९.१ षटकात ३ विकेटच्या बदल्यात पार केले.

भारताचा कर्णधार म्हणून पंतचा हा पहिला सामना होता. या सामन्यात अनेक मोठे विक्रम नोंदवले गेले. जाणून घेऊयात या विक्रमांबद्दल.

१) टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २११ धावा केल्या होत्या. इतकी चांगली धावसंख्य उभी करुन देखील भारताचा पराभव झाला. याआधी भारताविरुद्ध कधीच कोणत्याही संघाने २००पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करून विजय मिळवला नव्हता. टी-२०मध्ये द.आफ्रिके देखील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केलाय.

वाचा- मुंबईची पोरं हुशार… क्रिकेट विश्वात जे कोणत्याच संघाला जमलं नाही ते एकाच सामन्यात

२) श्रेयस अय्यर सलग ३ डावात नाबाद राहिला. आफ्रिकेविरुद्ध त्याने नाबाद ३६ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा बाद होण्याच्या दरम्यान त्याने २४० धावा केल्या आहेत. याबाबत तो एरॉन फिंचच्या सोबत अव्वल स्थानी पोहोचला आहे

३) भारताने याआधीच्या सलग १२ टी-२० सामन्यात विजय मिळवला होता. काल झालेल्या पराभवामुळे भारताची वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी हुकली. भारताशिवाय अफगाणिस्तान आणि रोमानिया यांनी सलग १२ टी-२० सामने खेळले आहेत.

वाचा- टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; फोटो, व्हिडिओची जगभरात चर्चा

४) ऋषभ पंत हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे, ज्याला पदार्पणाच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. याआधी विराट कोहलीचा देखील कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडूंनी कर्णधार म्हणून पहिली मॅच खेळताना २९ धावा केल्या होत्या.

५) आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये भारताचे नेतृत्व करणारा ऋषभ पंत हा दुसरा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. पंतचे वय २४ वर्ष २४८ दिवस इतके होते. त्याच्याआधी सुरेश रैनाने २३ वर्ष १९७ दिवशी देशाचे नेतृत्व केले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.