मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात दिनेश कार्तिकने शानदार फलंदाजी करत २७ चेंडूत ५५ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यानंतर कार्तिकचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरले. यासह त्याने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे. त्याचबरोबर संघाचे नेतृत्व करत ऋषभ पंतचा फ्लॉप शो सुरूच राहिला. पंतने पुन्हा एकदा निराशा केली आणि अवघ्या १७ धावांवर बाद झाला. अशा स्थितीत टी-२० विश्वचषकात भारतासाठी केवळ फलंदाजीच नाही तर यष्टिरक्षणातही कार्तिकची भूमिका महत्वाची असेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पॉवर प्लेमध्येच संघाने ४० धावांत दोन विकेट गमावल्या आणि त्यांनी १० षटकांत तीन विकेट्स गमवून ५६ धावा होत्या. अशा प्रसंगी संघाचे दोन फिनिशर कामी आले. दिनेश कार्तिक (२७ चेंडूत ५५ धावा) आणि हार्दिक पंड्या (३१ चेंडूत ४६ धावा) यांनी चांगला खेळ केल्याने संघाला ६ बाद १६९ अशी आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली.

वाचा – टीम इंडियाचे भन्नाट कमबॅक, दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवत भारताची मालिकेत बरोबरी

या सामन्यात कार्तिक १३व्या षटकात क्रीझवर आला. त्यावेळी भारताची अवस्था चार बाद ८१ धावा अशी होती. हार्दिक २० चेंडूत २५ धावा करून खेळत होता. दोघांनी डावातील १५ व्या षटकापर्यंत सावध खेळ केला. हार्दिक एकेकाळी बाद होता होता बचावला. एनरिक नॉर्खियाने टाकलेल्या १६व्या षटकातून दोघांनी मुक्तपणे फलंदाजी सुरु केली. या षटकात कार्तिकने दोन चौकार मारले तर हार्दिकही मागे राहिला नाही. केशव महाराजच्या शेवटच्या षटकातून १३ धावा काढल्या, ज्याने त्यापूर्वी अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली.

वाचा – बुढ्ढा होगा तेरा… युवा खेळाडूंना लाजवत दिनेश कार्तिकची तुफानी खेळी, भारताचा धावांचा डोंगर

कार्तिकने १८व्या षटकात ड्वेन प्रिटोरियसला कहर केला. क्रीजवर आपले डावपेच बदलत त्याने प्रिटोरियसच्या सलग तीन चेंडूंवर ६, ४, ४ धावा ठोकल्या. तसेच शेवटच्या तर षटकांत १६, १३, १६ धावा भारताला मिळाल्या. कार्तिकने २०० च्या स्ट्राईक रेटने धावा करत २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. प्रिटोरियसच्या एका चेंडूवर षटकार ठोकत त्याने अर्धशतकी पल्ला गाठला. मात्र, पुढचा चेंडू पुन्हा हवेत उडवण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. हार्दिक आणि कार्तिकमध्ये वेगवान ६५ धावांची भागीदारी झाली.

वाचा – फुटबॉल इतिहासात प्रथमच असे होणार; वर्ल्डकपचे आयोजन एकाच वेळी…

कार्तिकच्या नावे खास रेकॉर्ड
यासोबतच दिनेश कार्तिकच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. कार्तिक भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अर्धशतक करणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला. वयाच्या ३७ वर्षे १६ दिवशी त्याने हा पराक्रम केला. लक्षात घ्यायचे की कार्तिक भारताचा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला होता, जो जोहान्सबर्ग येथे १ डिसेंबर २००६ रोजी खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात कार्तिकने २८ चेंडूंत नाबाद ३१ धावा करून सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.