कल्याण : पतीपासून विभक्त झालेल्या एका ३० वर्षीय महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडित महिला गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोघा नराधमांविरोधात अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. गुड्डू उर्फ सिद्धेश भाटकर (वय ३०), राहुल देवराव बोरडकर (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या नरधमांची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश हा कल्याण पूर्वेतील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात कामाला आहे.

३० वर्षीय पीडित महिला कल्याण पश्चिम भागातील इंदिरा नगर परिसरात राहणारी आहे. तिचा पुण्यातील स्वारगेट भागात राहणाऱ्या एका तरुणाशी विवाह झाला होता. मात्र, काही घरगुती कारणावरून पीडित महिला २०२१ मध्ये कल्याणला पुन्हा आली. पण घरी न जाता ती कल्याण रेल्वे स्थानकातील चार नंबर फलाटावर एकटीच राहत होती. याचाच फायदा घेऊन काही महिन्यापूर्वी राजकीय पक्षाच्या कार्यलयात कामाला असलेला आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश याने पीडितेशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून कल्याण पूर्वेतील स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर कुठेही या घटनेची वाच्याता केली तर ठार मारण्याची धमकीही दिली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आरोपीच्या अत्याचाराने पीडिता गरोदर राहिल्याने लग्नासाठी तिने तगादा लावला होता. यामुळे आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश याने पीडितेचा पिच्छा सोडविण्यासाठी पीडितेची ओळख त्याचा मित्र असलेल्या आरोपी राहुलशी करून देऊन बेपत्ता झाला. त्यानंतर या दोघांमध्ये ओळख वाढल्यानंतर आरोपी राहुलनेही पीडितेवर त्याच्या घरात नेऊन बलात्कार केला. दुसरीकडे पीडिता गरोदर राहिल्यापासून आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश तीन – चार महिने पीडितेला भेटला नाही.

खरोखर चक्रावून टाकणारी घटना! त्याने मारलेली थाप खरी वाटली; मित्राने सहज

आपल्याला दोघांनीही फसवून बलात्कार केल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्यावर घडललेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३७६ (२) (एन) २३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दोन्ही आरोपींवर २ ऑगस्टला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच दोघांचा शोध घेऊन त्यांना ३ ऑगस्टला अटक करण्यात आली. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिवसाढवळ्या दुकानदार आणि महिलांना बेदम मारहाण, VIDEO सीसीटीव्हीत कैदSource link

Leave a Reply

Your email address will not be published.