करमाळा, सोलापूर : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे हे सध्या सकल मराठा समाजाचे एकमेव हिरो ठरले असून करमाळा तालुक्यातील वांगी येथे चक्क पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या उपस्थितीत त्यांची विराट सभा झाली. उजनी बॅकवॉटरवर असणाऱ्या वांगी येथील सभा सायंकाळी सात वाजता होणार होती मात्र समाजातून मिळणाऱ्या अलोट प्रेमामुळे जरांगे यांना करमाळ्यात पोहोचायला तब्बल पहाटेचे चार वाजले.

कडाक्याच्या थंडीतही हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुलेही जरांगे यांना ऐकण्यासाठी वाट पाहत थांबले होते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून त्याची उब घेत थांबलेल्या या हजारोंच्या गर्दीने जरांगे येताच एकच जल्लोष करीत त्यांचे जंगी स्वागत केले.

इतक्या पहाटेपर्यंत थांबलेल्या हा समाज पाहून जरांगे देखील भावुक झाले आणि आरक्षण मिळाल्यावर तुमचे ऋण समाज कधीही विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या समाजाचे आभार मानले.

जरांगे पाटलांच ठरलं, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रान पेटवणार, साताऱ्यात चार ठिकाणी तोफ धडाडणार,मॅरेथॉन दौरा
सभेठिकाणी ते ४ ते ५ मिनीटे बोलले. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहिल. तुमचं जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, ही सभा माझ्या कायमस्वरुपी आठवणीत राहील.

मनोज जरांगेंची ताकद वाढली, वातावरणनिर्मितीसाठी मराठा संघटना कामाला लागल्या; ठाणे, कोकणात सभांची तयारी?
आज गुरूवारी सातारा जिल्ह्यात त्यांच्या खटाव आणि मायणी या ठिकाणी दोन सभा होणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या वरवंड या गावात जरांगे यांची संध्याकाळच्या सुमारास मोठी सभा पार पडेल.

आरक्षण मिळाल्यावर तुमचे ऋण समाज कधीही विसरणार नाही, जरांगेंच्या चार मिनिटांच्या सभेने रेकॉर्ड तोडले!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *