नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेन्टी़-२० सामना शुक्रवारी रंगणार आहे. पण हा पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. त्यामुळे आता रोहित शर्माची चिंता वाढलेली आहे.

वाचा-भारत-वेस्ट इंडिजचे ट्वेन्टी-२० सामने ७ वाजता नाही, तर किती उशिरा सुरु होणार जाणून घ्या…

पहिल्या सामन्यापूर्वी भारताला दोन धक्के बसू शकतात. कारण या मालिकेमध्ये आता लोकेश राहुल खेळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राहुलला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो जर्मनीमध्ये उपचार घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर राहुल भारतामध्ये दाखल झाला आणि बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला होता. त्यानंतर राहुलला करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राहुलला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता तो या मालिकेत खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राहुलपाठोपाठ रवींद्र जडेजाही पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळू शकणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तिसरा ट्वेन्टी-२० सामना हा बुधवारी खेळवला गेला होता. या सामन्यात त्याला संधी दिली नव्हती. त्यावेळी बीसीसीआयने तो अजूनही १०० टक्के फिट नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या पहिल्या सामन्यातही तो अनफिट असल्यामुळे खेळू शकणार नसल्याचे दिसत आहे.

वाचा-भारताने पराभव केला त्यात आमच काय चुकलं; इंग्लंडनं ‘या’ संघावर काढला राग

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.या मालिकेतील पहिला सामना २९ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याचा टॉस हा संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने सामना सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना रात्री ८.०० वाजता सुरु होणार आहे. वनडे सामन्यांपेक्षा हे ट्वेन्टी-२० सामना एक तास उशिराने सुरु होणार आहेत. हे ट्वेन्टी-२० सामने रात्री ८.०० ते १२.०० या कालावधीत होतील, असे म्हटले जात आहे. पण जर पावसाने खोडा घातला तर हे सामने उशिरा संपू शकतात.

भारताचा संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

टी-२० मालिका-
२९ जुलै- पहिली टी २०
०१ ऑगस्ट- दुसरी टी २०
०२ ऑगस्ट- तिसरी टी २०
०६ ऑगस्ट- चौथी टी २०
०७ ऑगस्ट- पाचवी टी २०



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.