अकोला : गेल्या काही दिवसातील पावसाच्या खंडानंतर विदर्भात ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ७ व ८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता दिली आहे. अमरावतीच्या हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी हा अंदाज दिला आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अकोल्यात सायंकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

गेल्या आठवडाभरातपासून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेत शिवारांमध्ये आंतर्गत मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यात दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पावसाची हुलकावणी बसत आहे. अशातच दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत आहे.

वाचा- गुंतवणुकदार झाले मालामाल; फक्त २० दिवसात ६१८ रुपयांचे झाले २ लाख!

अभ्यासकांच्या मते, मान्सूनची ट्रफरेषा सध्या तिच्या सामान्य स्थितीमध्ये आहे. कमी जास्त दाबाचे, पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र सध्या दक्षिण भारतावर असुन पुढील ३ ते ४ दिवसात ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भात ५ ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज ४ ऑगस्ट रोजी अकोल्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

विदर्भात असा पावसाचा अंदाज….

>> आज ४ ऑगस्ट रोजी भंडारा, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. अमरावती, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता देण्यात आली.

वाचा- २३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान, कधी लागणार निकाल? वाचा संपूर्ण अपडेट्स

>> ५ ते ८ ऑगस्टदरम्यान, विदर्भात बहुतेक ठिकाणी ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे,

>> ९ ते ११ आगस्ट रोजी विदर्भात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता असणार तर मुसळधार पावसाचाही अंदाज दिला आहे.

>> ७ व ८ ऑगस्टला अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस होऊ शकतोय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.