मुंबई : असं म्हणतात, जगात एकासारखे दिसणारे सात जण असतात. अनेक सेलिब्रिटींचे प्रतिबिंबच वाटणारे चेहरे आपण पाहिलेत. अनेकदा त्यांचे चेहरे, हावभाव इतके सारखे असतात की पाहणाराही चुकतो. इंटरनेटवर ऐश्वर्या रायपासून रणबीर कपूर, सैफ अली खान, शाहरुख खान आणि सलमान खानपर्यंत सेम टु सेम दिसणाऱ्यांनी धक्केच दिलेत. आता करिष्मा कपूरसारखा तंतोतंत चेहरा असणारी हीना खान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे फोटो, व्हिडिओ पाहून ही करिष्मा कपूर नाही, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

कॅन्सरमुक्त झालेल्या महिमा चौधरीनं सांगितलं लेकीचं दु:ख, त्या काळात मुलीनंही सहन केल्या वेदना

करिष्मा कपूरचं प्रतिबिंब हीना खान
करिष्मा कपूरसारख्या दिसणाऱ्या या तरुणीचं नाव आहे हीना खान. ती पाकिस्तानमध्ये राहते. सोशल मीडियावर हीना खानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आणि लोकप्रिय झालेत. हीना काय करते? कशी आली चर्चेत?

लंडनमध्ये मोठी झालेली हीना आहे मेडिकलची विद्यार्थिनी


हीना खान लंडनमध्ये राहते. तिचा जन्मही तिथलाच. ही वैद्यकीय अभ्यासक्रम शिकतेय. पण हीनाचं आजोळ पाकिस्तानला आहे. एका मुलाखतीत हीना म्हणाली, तिची आई पाकिस्तानची. द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, तिनं डबस्मॅश व्हिडिओज तयार करायला सुरुवात केली होती. तिला अभिनयाची आवड आहे. म्हणून तिनं टिक टाॅक व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली.

अशी झाली सुरुवात


हिना म्हणते, ती करिष्मा कपूरसारखी दिसते, याची तिला जाणीवही नव्हती. लोकांनी तिला करिष्मा कपूरच्या डायलाॅग्जवर व्हिडिओ तयार करायला सांगितलं होतं. मग तिनं करिष्मा कपूरच्या संवादांवर व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. तेव्हा लोक तिला करिष्माची हमशकल म्हणायला लागले. तिला कुदरत का करिष्मा असंही म्हणतात.

सलमान खानच्या हत्येचा कट! ४ लाखात खरेदी केली गेली रायफल

हीनाचे फॅन फाॅलोइंग खूप


हीना खानचे इन्स्टाग्रामवर १८० K फाॅलोअर्स आहेत. त्यात वाढ होत आहे. आता करिष्मानं हीना खानचे व्हिडिओ पाहिलेत की नाही माहीत नाही. पण लोक तिला टॅग करत असतात.

कोणीच चूक नाही कोणीच बरोबर नाही, असं का बोलतेय अरुंधती

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.