मुंबई : हिंदी सिनेसृष्टीमध्ये यश चोप्रा यांच्या नावाभोवती एक वलय आहे. आज जरी ते हयात नसले तरी त्यांनी निर्मिती- दिग्दर्शन केलेल्या सिनेमांमधून त्यांची आठवण आजही प्रेक्षकांना आहे. यश चोप्रा यांनी वेगळ्या पठडीती सिनेमांची निर्मिती करून एक नवा पायंडा पाडला होता. ‘चांदनी’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर जारा’ आणि ‘दीवार’ यांसारखे सदाबहार सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती. सिनेमांबरोबरच यश यांचं खासगी आयुष्यदेखील खूप चर्चेत होते. यश यांची पत्नी पामेला यांनीदेखील त्यांच्या आयुष्यातील फारशी कुणाला माहिती नसलेली अनेक गुपित सांगितली आहेत. यश चोप्रा आणि प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज याचं एकमेकांवर प्रेम होतं. इतकंच नाही तर त्यांनालग्न देखील करायचं होतं, असं पामेला यांनी सांगितलं.

काय म्हणाल्या पामेला चोप्रा

यश आणि मुमताज यांच्या प्रेमाचे किस्से आजही बॉलिवूडमध्ये रंगवून रंगवून ऐकवले जातात. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांना लग्न देखील करायचं होतं. परंतु मुमताज यांच्या घरच्यांनी यश यांचं स्थळ नाकारलं होतं. या सगळ्या बाबत पामेला यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पामेला सिंह यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही गोष्टीं सांगितल्या आहेत.

पहिल्या भेटीत ओळखच झाली नाही

त्यांनी सांगितलं की, त्यांची आणि यश यांची पहिली भेट दिल्लीतील स्टार क्रिकेट शोमध्ये झाली होती. हे दोघंजण एकमेकांपासून काही अंतरावर बसले होते. यश अनेकदा पामेला यांच्या बहिणीकडे बघत होते. परंतु त्यावेळी पामेला आणि यश यांची भेट झाली नाही. यश यांच्या भाचीच्या लग्नावेळी पामेलाशी त्यांची अधिकृत भेट झाली. तिथं यश यांनी पामेला यांच्या गाण्याचं भरभरून कौतुक केलं होतं.

यश चोप्रा फार व्यवहारी होते

त्यानंतर एका फॅमिली फ्रेंडच्या माध्यमातून त्यांच्या आईनं या दोघांच्या लग्नाचा विषय काढला. पामेला यांच्या माहेरी कडक शिस्तीचं वातावरण होतं. परंतु यश यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणं बदलून गेलं. पामेला (Yash Chopra Wife) पुढे म्हणाल्या की, यश यांनी एकाहून एक सरस असे रोमँटिक सिनेमे बनवले. परंतु खऱ्या आयुष्यात ते खूपच व्यवहारी होते. यश यांनी त्यांच्या अनेक सिनेमांचं चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये केलं. कारण तिथं चित्रीकरण करणं खूप सोपं होतं आणि तिथं हव्या त्या गोष्टी त्यांना पटकन मिळायच्या.

सुरुवातीला वाटायची असुया

यश चोप्रा यांनी बॉलिवूडमधील बहुतांश आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. अशावेळी पामेला यांना असुरक्षित वाटायचं का असं विचारलं असता त्यांनी हसत हसत उत्तर दिलं की, अर्थात मला खूप असूया वाटायची. जेव्हा बॉलिवूडमधील सुंदर महिला त्यांच्याभोवती असायच्या तेव्हा मला खूप असूया वाटायची. अर्थात याची मला नंतर सवय झाली. कारण मला माहिती होतं यशसाठी त्याचं कुटुंब प्रथम आहे.

लग्नाआधी खूप झालं गॉसिप

लग्नाआधी त्याच्याबाबत खूप सारे गॉसिप झाले. एक गॉसिप मी असंही ऐकलं होतं की, एका अभिनेत्रीबरोबर त्याचं सीरिअस अफेअर होतं आणि ते दोघंजण लग्न देखील करणार होते. यशच्या मित्राला रोमेश याला देखील पामेला यांनी त्याबद्दल विचारलं होतं. तेव्हा त्यानं सांगितलं की ते दोघं चांगले मित्र आहेत. त्यापेक्षा जास्त त्यांच्यात काही नाही. परंतु या उत्तरानं पामेला याचं समाधान झालं नाही.

आखंड प्रेमात होते यश- मुमताज

मुमताज आणि यश यांनी १९६९ मध्ये ‘आदमी और इंसान’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं सांगितलं जातं. एकमेकांसोबत कायम एकत्र राहण्याच्या आणाभाकाही त्यांनी घेतलेल्या असंही म्हटलं गेलं होतं. विशेष म्हणजे दोघांनी घरी लग्नाचा विषयही काढला होता. इतकंच नाही तर यश यांचे मोठे भाऊ बीआर चोप्रा हे मुमताज यांच्या घरी तिचा हात मागायला गेले होते.

घरच्यांनी दिला स्पष्ट नकार

मुमताज यांच्या घरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मुमताज यांनी करिअवर लक्ष केंद्रीत करावं असं तिच्या घरच्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर १९७० मध्ये पामेला आणि यश याचं लग्न झालं. यश यांच्या लग्नानंतर मुमताज हिनंदेखील लग्न केलं आणि मनोरंजन विश्वाला अलविदा केलं. दरम्यान, यश यांना डेंग्युची लागण झाली आणि त्यांचं २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले. त्यावेळी ते ८० वर्षांचे होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.