अमरावती: मेळघाटात पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. मालवाहक पिकअप झाडावर आदळल्याने हा अपघात घडला आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ज्या परिसरात घडली तो घाट हा अतिदुर्गम भागात येतो. यातील जखमींना परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात हलवले आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नेमकं काय झालं?

सातपुड्यात असलेल्या धारणी तालुक्यातील ग्राम सुसरदा येथे मोठा आठवडी बाजार भरत असतो. यासाठी अकोट शहर, अंडगाव, हिवरखेड आणि आसपासच्या परिसरातील भाजी विक्रेते विक्रीकरिता जात असतात. आज ३ ऑगस्ट २०२२ रोजी नेहमीप्रमाणे बाजार आटोपून परत येत असताना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास राणेगाव घाटात मालवाहक पिकअप झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर तब्बल १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा –मेळघाटात भीषण अपघात; १८ जणांना घेऊन जाणारी क्रुझर पलटली, मजुरांचा चालकावर गंभीर आरोप

यातील जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने धारणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. अद्याप जखमी आणि मृतकांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा –भीषण! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली घाटात पलटली; एकाचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी

वर्ध्यातील एक गाव तब्बल चार दिवस पाण्याखालीच; अजित पवारांकडून ऑन द स्पॉट पाहणीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.