नेमकं घडलं तरी काय, पाहा…
भारताला या मालिकेत तिसऱ्या सामन्यात विजय मिळाला. भारताचा हा पहिला विजय होता. या विजयामुळे भारताचे मालिकेतील आव्हान कायम राहू शकले. या मालिकेत ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फटकेबाजी केली. एका षटकात तब्बल पाच चौकार लगावत ऋतुराजने आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर ऋतुराजने या सामन्यात दमदार अर्धशतकही झळकावले. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यातील ऋतुराजचे हे पहिले अर्धशतक ठरले. या सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही मोठी भूमिका बजावली. कारण चहलने या सामन्यात महत्वाच्या तीन विकेट्स मिळवल्या आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यानंतर चहलने ऋतुराजची खास मुलाखत घेतली.
Chahal TV is BACK! Enjoy this special segment of @yuzi_chahal chatting up with @Ruutu1331 after #TeamIndia’s w… https://t.co/4o4kQw8MeG
— BCCI (@BCCI) 1655267303000
या मुलाखतीमध्ये चहलने एक खोचक प्रश्न ऋतुराजला विचारला. या सामन्यात एक चौकार मारताना ऋतुराज हा जमिनीवर पडला होता. त्यावर चहलने ऋतुराजला विचारले की, ” या सामन्यात एक चौकार तू असा लगावलास की, त्यामध्ये तू बॅटचाही वापर केलास, हेल्मेटचाही वापर केलास आणि जमिनीवरही पडलास. या सामन्यात तु पाच चौकार लगावले तेव्हा सहाव्या चेंडूच्या वेळी मनात काय भावना होत्या.” या सामन्यात चौकार लगावताना तु पडला होतास, ही नकोशी आठवण चहलने यावेळी ऋतुराजला करून दिली. ऋतुराजने यावेळी त्याला चोख उत्तर दिले. ऋतुराज यावेळी म्हणाला की, ” संघातील प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ हे चांगली मेहनत घेतात आणि हे त्याचेच फळ आहे मला मिळाले आहे. त्याचबरोबर मी जिममध्ये जातो आणि तुझ्यासारख्या व्यक्ती जिममध्ये जात असतात आणि त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळत असते.” ऋतुराजने यावेळी खोडी करणाऱ्या चहलला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.