गुरुबाळ माळी, कोल्हापूर

साखर उद्योगाच्या (Sugar Industry) इतिहासात प्रथमच प्रचंड वाढलेले राज्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र आणि त्यातून झालेले विक्रमी साखर उत्पादन यामुळे या उद्योगासमोर मोठे संकट उभे असतानाच इथेनॉलने (Ethanol) या उदयोगाला संजीवनीच मिळाली. त्याच्या विक्रीतून कारखान्यांना आठ हजार कोटी रूपये तातडीने मिळाल्याने शेतकऱ्यांना एफआरपी देता आली. यामुळे पुढील वर्षी नवीन ४० सह राज्यात तब्बल १६० पेक्षा अधिक कारखान्यातून तीनशे कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उदिष्ट ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा हेच इंधन या उद्योगाचे संकटमोचक ठरण्याची चिन्हे आहेत. (new ethanol projects will be started in 40 factories in the state)

राज्यातील १९९ साखर कारखान्यांचा गळित हंगाम या आठवड्यात संपला. त्यामध्ये तब्बल १३२०.३१ लाख मे. टन उसाचे गाळप होवून १३७ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. शेतकऱ्यांना सुमारे चाळीस हजार कोटी एफआरपी मिळाली. यामध्ये ३२ हजार कोटी साखर विक्रीतून तर आठ हजार कोटी रूपये इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना मिळाले. अतिरिक्त साखर उत्पादित झाल्यास त्याचे काय करायचे हा प्रश्न कारखान्यांसमोर होता. पण इथेनॉल निर्मितीने त्यांचा हा प्रश्न सोडवला आणि या इंधनाची कारखान्यांना नवसंजीवनी मिळाली.

क्लिक करा आणि वाचा- पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सरकारचे मोठी पाऊल; सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी

राज्यात २६४ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीच क्षमता असली तरी यंदा २०६ कोटी लिटरची निर्मिती झाली. यासाठी वीस लाख मे. टन ऊसाचा वापर झाला. कारखान्यांना तातडीने रक्कम मिळाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला. साखर निर्यातीवर केंद्राने यंदा निर्बंध आणले आहेत. यामुळे यंदाही कारखान्यांकडून अधिक इथेनॉलची निर्मीती होण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्ह्णून देशातील १९७ कारखान्यांनी त्यासाठी केंद्राकडे परवाना मागितला आहे. यामध्ये राज्यातील ४० कारखान्यांचा समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘दुसऱ्याच्या कामावर फोटोसेशन करायची मला सवय नाही’; महाडिकांचा मडलिंक यांना टोला

येत्या हंगामात राज्यात ३०० कोटी तर देशात ८०० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्राने सहा टक्के व्याज अनुदानाची योजना यासाठी आणल्याने यंदा इथेनॉल निर्मिती करण्यासाठी कारखाने अधिक प्रमाणात तयार होणार आहेत. हे इंधनच पुढील हंगामातही या उद्योगाचे तारणहार ठरण्याची चिन्हे आहेत.

क्लिक करा आणि वाचा- धनंजय महाडिकांचा डबल धमाका; विजयानंतर भाजपकडून आणखी एक मोठी जबाबदारी?

राज्यातील साखर उदयोग

> एकूण साखर कारखाने १९९
> ऊस गाळप १३२०.३१ लाख टन
> साखर उत्पादन १३७. २८ लाख टन
> सरासरी साखर उतारा १०.४०
> इथेनॉल निर्मिती २०६ कोटी लिटर
> इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने ११२
> इथेनॉल विक्री ७८१६ कोटी रूपये

राज्यात विशेषता मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात यंदा ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचे उत्पादन वाढणार आहे. अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून केंद्राने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यानेच पुढील वर्षी राज्यात नव्याने ४० कारखान्यात त्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

शेखर गायकवाड, साखर आयुक्तSource link

Leave a Reply

Your email address will not be published.