मुंबई: बॉलिवूडमधील प्रतिष्ठित आणि मानाचा समजणारा आयफा पुरस्कार सोहळा (IIFA 2022) हल्लीच अबुधाबी याठिकाणी पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडच्या बड्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. ग्रीन कार्पेटवर चाहण्यापासून आयफाच्या मुख्य कार्यक्रमात बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. या सोहळ्यात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal at IIFA 2022) देखील उपस्थित होता. विकीने यावर्षी ‘सरदार उधम’ या सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (Vicky Kaushal Wins Best Actor for Sardar Udham) हा पुरस्कार देखील जिंकला. विकीने पुरस्कार जिंकण्याची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा विकीच्या लग्नाची झाली.

सोशल मीडियावर आयफामधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यातीलच हा एक व्हिडिओ. ज्यामध्ये विकी कौशलच्या (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding) लग्नाचा थाट पाहायला मिळतो आहे. या पुरस्कार सोहळ्यात विकीची वरात काढण्यात आली. विकीला अगदी खोट्या घोड्यावरुन याठिकाणी आणले जात आहे. या वरातीमध्ये त्याच्या आई-वडिलांसह अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. लग्नानंतर विकीने उपस्थिती दर्शवलेला हा पहिलाच अवॉर्ड शो होता. यावेळी कतरिना उपस्थित नव्हती. पण या कलाकारांनी तिच्या पोस्टरशी विकीचे पुन्हा एकदा लग्न लावून दिले. पोस्टरला वरमाला देखील घालायला लावली.

हे वाचा-VIDEO: ‘मला आनंद आहे की…’, सुशांतला आठवून क्रिती सेनॉनची भावुक पोस्ट

अशाप्रकारे विकीची गंमत यावेळी करण्यात आली. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख, मनीष पॉल, जिनिलिया डिसूझा, क्रिती सेनॉन, तमन्ना, पंकज त्रिपाठी या थोडक्यात उरकण्यात आलेल्या लग्नसोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत. विकी कौशलही आनंदाने पुन्हा एकदा लग्नविधींचा आनंद घेतो आहे.


हे वाचा-‘रानबाजार’साठी गुटखा खाण्याचा असा केला सराव, प्राजक्ताचा VIDEO व्हायरल

दरम्यान आयफा २०२२ मध्ये विकी कौशल याने ‘सरदार उधम’ या सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार स्विकारताही विकी कतरिनाला विसरला नाही. त्याने कुटुंबीयांचे आभार मानत असताच कतरिनाचाही स्पेशल उल्लेख केला होता. सोशल मीडियावर विकीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नववधू कतरिना कैफच्या मंगळसूत्रानं वेधल्या साऱ्यांच्या नजरा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.